You are here
Home > चंद्रपूर > पोलीस कर्मचारी मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीसांना यश!

पोलीस कर्मचारी मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीसांना यश!

अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलची बातमी खरी ठरली.
मुलानेच केला जन्मदात्या वडीलांचा खुन,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दिनांक:२३/११/२०१९ रोजी सुखदेव महादेव सोनुने वय ५४ वर्ष रा.पोलीस वसाहत, तुकुम चंद्रपुर यांचे डोक्याला मागील बाजुस गंभीर दुखापत
असलेल्या स्थितीत त्यांचे राहते घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगा यांना दिसुन आल्याने मृतकची पत्नी यांनी दिलेल्या प्राथमिक खबरवरुन पोस्टे रामनगर येथे
अकस्मात मृत्यू क्र. ११९/२०१९ प्रमाणे दाखल करुन तात्काळ तपास सुरु करण्यात आला होता.
या संदर्भात ज्या स्थितीत म्रूतदेह पडून होता आणि म्रुतकाच्या शरीरावर जखमा होत्या त्यावरून हा घातपातच होता म्हणूनच दैनिक न्यूज पोर्टल भुमीपुत्राची हाक मधे “चंद्रपूर वाहतूक शाखेचे मौहरर सुखदेव सोनुने यांचा घातपात” या हेडलाईन ची बातमी प्रकाशित करण्यात आली होती.या संदर्भात पोलिस
अकस्मात मृत्युचा तपास करीत असताना प्राप्त वैद्यकीय अहवाल व मृतकचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने वय २४ वर्ष, यास विचारपुस केली तर
त्यास विचारपुस करीत असताना पोलीसांना त्याचे बोलण्यामध्ये एकवाक्यता
दिसुन आली नाही. त्यामुळे पोलीसांचा संशय वाढल्याने सखोल तपास व
विचारपुस केली असता दिनांक २३/११/ २०१९ रोजी संध्याकाळी ५.३०
वाजता दरम्यान वडील व मुलांमध्ये शाब्दीक वाद झाल्याने त्या वादाच्या रागातुन
मुलगा तुषार याने वडील सुखदेव सोनुने यांना लोखंडी रॉडने ठार मारले असे
तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. मृतकचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने याचेविरुध्द
अप क्र १४५१/२०१९ कलम ३०२,२०१ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात
आला असुन त्यास दिनांक:२७/११/ २०१९ रोजी रात्री अटक करण्यात आली
आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.वडिलांचा हत्त्यारा मुलगाच होता हे अगोदरच शीद्ध झालं होतं पण पोलिस यंत्रणेला त्याचे सबळ पुरावे मिळाल्याने एका नालायक मुला कडून चांगला बाप मारल्या गेला ही गोष्ट सामजिक मनावर वेदना देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा