You are here
Home > Breaking News > महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महागुजरात बिज कंपनी कडून फसवणूक ! 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महागुजरात बिज कंपनी कडून फसवणूक ! 

क्रुषि केंद्र संचालक, कंपनी विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी. तरीही क्रुषि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ! 

सिंदेवाही प्रतिनिधी :-

सिंदेवाही शहरातील शेतकरी  गणेश लक्ष्मण गंडाटे यांनी 5 एकर शेतीसाठी लागणारे धान बीज सिंदेवाही येथील एका नामांकित कृषी केंद्रातून धान बीज खरेदी केले. खरीप हंगाम वर्ष 2019 या वर्षात धान बीज महागुजरात सिड्स या कंपनीचे खरेदी केले व पेरणी करून घेतले धान गर्भात येऊन धान (लोबं)येण्यास सुरुवात झाली. त्या वेळी पूर्णपणे एकाच वेळेस सुरुवात पाहिजे होते. परंतु ते लावलेले बीज काही मागेपुढे उगवन्यास सुरुवात झाली. खरेदी करताना धान बीज दाखवण्यात आलेले चमन हे श्रीराम धानाची पोत(जात) असे म्हणून कृषी केंद्र मालकाने ते विक्री केली .आणि ते शेतकऱ्यांन 5 हजार 900 रुपये च्या भावात खरेदी केले. परंतु या हंगामात धान उगविण्याची सुरुवात झाली. यावेळेस काही ठोकळ स्वरूपाचे उगवले आहेत .त्यामुळे खरेदी केलेले धान पूर्णपणे बोगस आहे. हे लक्षात आल्याने त्यांनी तिथून खरेदी केली.तिथे जाऊन कृषी केंद्र मालकाची भेट घेतली व त्याने घडलेला प्रकार सांगितला . त्यावरून कृषी केंद्र मालकाने मी विकली असेल परंतु ही धान बीज महा गुजरात सीड्स यांची आहे .तुम्ही त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी बोलणे करा.असे सांगितले.त्यानुसार गंडाटे शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलणे करून ,व आपल्या शेतात घेऊन त्यांना मौका चौकशी केले व शेतामधील धान लोंबा ची पाहणी केली त्यानुसार त्या कंपनीच्या प्रतिनिधीने सुद्धा कंपनीला अहवाल पाठवतो व तुम्हाला तुमच्या धानाचे नुकसान भरपाई मिळणार असे सांगितले. व तिथून निघून गेले. त्यानंतर कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून गंडाटे यांनी कृषी केंद्र सिंदेवाही मालकाला आणि महागुजरात सिड्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड त्यांना वारंवार फोन करून विचारना केली परंतु अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेले नाही.असा तक्रार अर्ज कृषी अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्याकडे दिलेला आहे. हा प्रकार इथेच थांबत नाही. तर दुसऱ्या शेतकऱ्याने पण या कृषि केंद्रातुन विकत घेतली होती. ती सुद्धा धान बीज बोगस निघाली आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे व त्या शेतकऱ्यानी  तक्रार दिलेली आहे.. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गुजरात  बोगस बिज विकून एक प्रकारे आर्थिक फसवणूक करीत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा