You are here
Home > महाराष्ट्र > चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटवायची की सुरू ठेवायची ? हे सरकार ठरवेल, मात्र बघा “एकच प्याला”

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटवायची की सुरू ठेवायची ? हे सरकार ठरवेल, मात्र बघा “एकच प्याला”

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन आता जवळपास पाच वर्ष होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि जिल्ह्यातील तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी दारूबंदीची समीक्षा करणे आवश्यक आहे,  कारण जेवढे लोक दारू सुरू असतांना दारूमुळे मरण पावले नाही त्यापेक्षा जास्त लोक दारूबंदी झाल्यानंतर मेले हे सरकारी आकडे आहेत. तर मग दारूबंदी करून सरकारनी आणि भाजपचे नेते तथा तत्कालीन अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साध्य काय केले ? उलट या चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या संख्येत वाढ केली. आणि त्याचं दरम्यान जिल्ह्यातील अर्ध्याअधिक कंपन्या बंद झाल्या त्यामुळे दारूबंदी ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कर्दनकाळ ठरली आहे,  हे आता सर्व जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे आता नवीन सरकारने जिल्ह्याची दारूबंदी सुरू ठेवायची की उठवायची ? याची समीक्षा करावी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली हा जो शेरा मारला होता त्याची उजळणी करावी अशी अपेक्षा सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आहे.

आता या दारूबंदी संदर्भात जनतेमध्ये तीव्र असंतोष खदखदत असतांना एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात दाखविण्यात येणार आहे त्यामुळे दारूचे परिणाम आणि त्यामुळे होणारी संसाराची वाताहात याचे उत्क्रुष्ट लेखन आणि प्रस्तुतीकरण या एकच प्याला नाटकांतून बघावयास मिळणार आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी सोलापुरात केला [१]. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. त्यात वि. सी. गुर्जरांनी नंतर पदं लिहिली. या नाटकातली सिंधू बालगंधर्व साकारणार होते, त्यामुळे आणि तेव्हाच्या रिवाजानुसार नाटक संगीत होणार होते, यात वादच नव्हता. उलट गडकऱ्यांनी नारायणराव राजहंसांना, तुम्हाला फाटके लुगडे नेसायला लावीन, असे सांगूनच ठेेवले होते असे म्हणतात; ह्या नाटकाचे कथानक ऐकूनच बालगंधर्वांनी अशा भूमिकेसाठी गोणपाट घालूनही काम करायची माझी तयारी आहे, असे त्यांना उत्तर दिले होते.

दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील सुधाकर सारखे अनेक लोक आजही संसाराचा नाश करतोय मग दारूबंदी करून  फायदा तो काय ? हा प्रश्न सुद्धा त्या अर्थाने महत्वाचा आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा