You are here
Home > नागपूर > कनिष्ठ महाविद्यायीन शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर धरणे आंदोलन

कनिष्ठ महाविद्यायीन शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर धरणे आंदोलन

 

नागपूर – शिक्षण विभागाकडून अनेक वेळा घोषणा करूनही मागील १५ वर्षापासून उच्च माथमिक शाळेतील शिक्षक विनावेतन काम करीत आहे. सभागृहात घोषणा होऊनही अनुदानाची तरतूद न झाल्याने शिक्षक संतप्त झाले आहे. नागपूर येथे शिक्षण उपसंचाल कार्यलयासमोर आज, सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. बिना अनुदानित उच्च माध्यमिक  कृती समितीने अनुदानाच्या मागणीसाठी आज पर्यंत 221 आंदोलने केली आहे. पावसाळी अधिवेशनात  शिक्षण मंत्री डॉ. आशिष शेलार यांनी हा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत उपसमितीचा अहवाल प्राप्त झाला असूनही अद्याप निर्णय मात्र केला जात नाही विशेष म्हणजे  दोन कॅबिनेटच्या बैठका होऊनही अद्याप शिक्षकांना त्यांच्या परिवाराला शासन व्हेंटिलेटरवर ठेवत आहे. असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे . आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय होण्यासाठी शिक्षक आमदारांनी शासनावर दबाव आणणे गरजेचे असल्याचे शिक्षण संघटनेने म्हटले आहे. त्याबाबत आज शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे मोठ्या संख्येने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात शिक्षण आंदोलन करीत असून येत्या 9 तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यानंतर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा. गजानन डाखले उपाध्यक्ष, मंगेश चालखोर, प्रा. बोरकर गोंदिया, प्रा.रणदिवे, प्रा.अर्जुनकर, प्रा.चौधरी प्रा.मामुलकर, प्रा.उरकुडे, मिरचे मॅडम तसेच नागपूर विभागातील शिक्षक उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा