You are here
Home > महाराष्ट्र > भाजपचे महाराष्ट्राची सत्ता गमावल्यानंतर विदर्भ वेगळा करण्यासाठी मंथन सुरू !

भाजपचे महाराष्ट्राची सत्ता गमावल्यानंतर विदर्भ वेगळा करण्यासाठी मंथन सुरू !

भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या आरोळ्या सुरू, विदर्भात सत्ता स्थापनेच्या हालचालीला येणार वेग, 

लक्षवेधी :-

फुले-शाहू-आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा देश आहे,  पण भाजपनी तो केवळ गोडसे सावरकर,  शामाप्रसाद मुखर्जी आणि हेडगेवार यांच्या पुरता मर्यादीत ठेवून या देशात हुकमी राजवट व हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवला आणि संपूर्ण भरतात फक्त आपलीच सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी देश विरोधी निर्णय आणि अहंकारयुक्त सत्ता चालवलेली आहे. त्यामुळे या देशात अंधभक्त जर सोडले तर प्रत्त्येक क्षेत्रातील लोक संतापलेले आहे आणि म्हणूनच आता देशातील त्यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.अर्थात भाजपचा मागील २५ ते ३० वर्ष युतीत सहभागी पक्ष शिवसेना आता सोडून गेल्यानंतर देशातील इतर राज्यात सुद्धा भाजपला प्रादेशिक पक्ष नाकारणार आहे असे चिन्ह दिसत आहे.

भाजपची हुकुमशहा पद्धती महाराष्ट्र जास्त काळ खपवून घेणार नाही याची नुकतीच प्रचिती भाजपच्या नेत्यांना आली असेलच कारण दिल्लीवर राज्य महाराष्ट्राने केलेले आहे हा छत्रपतींचा इतिहास आहे. केवळ दडपशाही करून व शासकीय चौकशी यंत्रणेचा गैरवापर म्हणजे तुम्ही या देशातले हुकुमशहा होत नाही,  कारण हा महाराष्ट्र आहे आणि येथील लोकांना समजत नाही असे ग्रुहीत धरून जर येणारी सत्ता आणायच्या वल्गना तुम्ही करीत असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.अशी महाराष्ट्रातील जनतेचा इशारा आहे, पण आता भाजप आपल्या सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे करून विदर्भ वेगळा करण्याचे छडयंत्र करणार आहे.

विदर्भात भाजपला सत्ता मिळेल एवढी संख्या जेमतेम आहेच. शिवाय आम्ही दिलेला शब्द पाळून विदर्भ वेगळा केला असा यांना प्रचार करण्याकरता वाव सुद्धा आहे. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा विदर्भाची भैरवी यांनी गायलीच होती त्यामुळे आता भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून स्वतंत्र विदर्भ निर्माण करणार आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा