You are here
Home > महत्वाची बातमी > शेवटी राजसाहेब ठाकरे यांची भविष्यवाणी खरी ठरली!

शेवटी राजसाहेब ठाकरे यांची भविष्यवाणी खरी ठरली!

महाराष्ट्रात  शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच सरकार स्थापन.

लक्षवेधी :-

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे एकमेव राजकीय नेते आहेत जे सिद्धांताच आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असं राजकारण करतात , कारण त्यांना सत्तेपेक्षा जनतेला दिलेला शब्द आणि त्यांचा प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. एक वेळ मनसेचे नगरसेवक शिवसेनेने मुंबईत चोरले, दुसरीकडे नाशिक मधे भाजपने नगरसेवक फोडले.पण त्यावर त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही, एवढेच काय जेंव्हा मनसेचे आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांचा म्रुत्यु झाल्यानंतर जेंव्हा राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नीला मंत्रीपदाचे आमिष दाखवून उमेदवारी दिली पण मनसेकडून त्यांनी उमेदवारी घेतली नसताना सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनी खरं तर आपला हक्काचा उमेदवार ठेवायला हवा होता पण त्यांनी राजकीय द्वेषाच राजकारण न करता त्यांनी सांगितलं की रमेश वांजळे यांच्या पत्नी विरोधात उमेदवार उभा न करणे हीच रमेश वांजळे यांना श्रद्धांजली आहे.
भारतीय राजकारणात असा एकही नेता नसेल की आपला एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही पण तब्बल १० प्रचार सभा घेऊन जनतेला आव्हान करतो की या देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाणाऱ्या मोदी शहा या जोडीला देशाच्या राजकीय पटलावरुन हद्दपार करा. राजसाहेब ठाकरे यांनी तो आवाज बुलंद केला आणि मोदी शहा विरोधात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कान्याकोपऱ्यात हा विचार पोहचवीला.

त्यामुळे राजसाहेब ठाकरे हे स्वार्थासाठी राजकारण करीत नाही तर ते देशाच्या आणि राज्यांच्या भल्यासाठी राजकारण करतात हे शीद्ध होते.आणि म्हणूनच मोदी शहा या गुजराती जोडीमुळे देश खड्ड्यात जातोय आणि देशात अघोषित आणीबाणी लावल्याने देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून या जोडगोळीला देशाच्या राजकीय पटलावरून हद्दपार करण्याचे आव्हान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर केले होते.
राजसाहेब हे अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टीचे नेते आहेत , ते इतरांसारखे सत्तेसाठी हपापलेले नाही किंव्हा त्यांना वारसहक्काने उद्धव ठाकरे सारख सगळ काही बनविलेल मिळालं नाही तर त्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःचा पक्ष काढून नेत्रुत्व शीद्ध केलं आहे आणि या महाराष्ट्राला त्यांनी विकास आराखडा दिला जो या महाराष्ट्राचा कायापालट करू शकतो त्यामुळे ते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेत.राजसाहेब ठाकरे जे जे आपल्या भाषणामध्ये बोलतात किंव्हा मुलाखतीच्या माध्यमांतून आपल्या प्रतिक्रिया देतात तेव्हा ते अभ्यासपूर्ण बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या भविष्याचा एक प्रकारे वेध घेतलेला असतो.
आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच संयुक्त सरकार स्थापन झालं आहे दरम्यान, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी वर्तवलेल्या भाकिताचा व्हिडीओ समोर आला आहे.
दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा एक व्हिडिओ मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शेअर केला आहे. भाजपा आणि शिवसेना निवडणुका एकत्र लढवणार. निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार आणि भाजपा विरोधी पक्षात बसणार. हा काय पत्त्यांचा क्लब आहे? माझे पिसून झाले आता तू पिस, तुझे पिसून झाले आता मी पिसतो, असं राजसाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्तास्थापन झाली आहे.दरम्यान, १०५ जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना आता विरोधी बाकावर बसाव लागणार आहे.त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी अशा नौटंकीबाजाच राजकारण तेंव्हाच ओळखलं होतं. अर्थात राजसाहेब ठाकरे हा नेताच खरा मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढताना दिसतात आणि बाकी राजकीय पक्षाचे नेते सत्तेसाठी विकले जातात किंव्हा आमदार विकत घेतात आणि मतदारांची अब्रू घालवतात त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचाच करिष्मा महाराष्ट्रात चालेल अशी आता चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा