You are here
Home > महाराष्ट्र > हेडगेचा खुलासा, ८० तासाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे ४० हजार कोटी पळवले केंद्रात,

हेडगेचा खुलासा, ८० तासाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे ४० हजार कोटी पळवले केंद्रात,

राज्यांच्या तिजोरीत खणखणाट !

महाराष्ट्र खबर :-

भाजपकडे बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेनंतर केवळ ८० तासांत पायउतार व्हावे लागले होते. फडणवीस ८० तासांसाठी का मुख्यमंत्री बनले यावर भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. केंद्र सरकारचा ४० हजार कोटी निधी वाचविण्यासाठी महाराष्ट्रात फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असा दावा हेगडे यांनी केला आहे.

” सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस (फडणवीस) ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केले? भाजपकडे बहुमत नव्हते. हे आम्हाला माहित नव्हते का? बहुमत नसतांंनाही तरीही ते मुख्यमंत्री बनले. असे प्रश्न प्रत्येकजण विचारत आहेत”.
हेगडे यांच्याकडे सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी होता. जर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून फडणवीस यांच्यापूर्वी सत्ता स्थापन केली असती तर त्यांना ४० हजार कोटी रुपयांच्या निधी मिळाला असता पण राज्यातील नव्या आघाडी सरकारला निधीच मिळू नये त्यासाठी सत्ता स्थापनेचा ड्रामा करण्यात आला, असाही खुलासा हेगडे यांनी केला आहे.

अगोदरपासून भाजपने यासाठी रणनिती आखली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ तासांच्या आत सर्व ४० हजार कोटी निधी जेथून आला होता; तेथे तो परत पाठवून दिला. यामुळे फडणवीस यांनी सर्व निधी केंद्र सरकारकडे पाठवून महाराष्ट्रातील जनतेच्या योजना आणि विकास निधी पासून वंचित करून एकप्रकारे दगा फटका केला हे शीद्ध होते.

अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या क्रुत्त्याचा निषेध सर्वत्र निषेध केल्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा