You are here
Home > चंद्रपूर > सख्ख्या भावाने केला बहिणीवर बलात्कार, भाऊ बहिनीच्या पवित्र नात्याला केले कलंकित !

सख्ख्या भावाने केला बहिणीवर बलात्कार, भाऊ बहिनीच्या पवित्र नात्याला केले कलंकित !

भद्रावती प्रतिनिधी: –

भद्रावती शहरात बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून सख्या भावाने आपल्याच बहिणीवर अत्याचार केल्याने समाजात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. या प्रकऱणात पिडीतेने आपल्यावर झालेल्या अत्त्याचाराची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

भद्रावतीत शहरात अशी पहिलीच घटना असून आशिष झाडें(28) हा आरोपी गौराळा येथील रहिवाशी आहे. त्याने आरोपीने आपल्याच विवाहित बहिणीवर घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत बळजबरीने अत्याचार केला. पीडिता ही विवाहित असून काही कारणास्तव माहेरी आली होती. आरोपी हा अविवाहित असून 2017पासूनच आपल्या बहिणीची छेडखानी करीत होता दरम्यानया वेळेस ती माहेरी आल्यावर आई-वडील बाहेर गेल्याच्या संधीचा फायदा घेत त्याने हे कृत्य केले.ही घटना घडल्यावर पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती कथन केल्यावर आरोपी विरुद्ध कलम 376(2-अ ), 506 अन्वये तक्रार दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.मात्र या घटनेने भाऊ वहिनीच्या पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या नराधम भावाविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेकडून येत आहे.हैद्राबाद येथे घडलेल्या प्रकरणाचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध होत असतानाच भद्रावतीत घडलेल्या या घटनेमुळे आपल्याच घरात मुली सुरक्षित नसल्याचे चिंतनीय चित्र समाजमनावर आघात करणारे आहे .

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा