You are here
Home > महाराष्ट्र > पंकजा मुंडे यांच्या संभाव्य राजकीय भूकंपाला घाबरून भाजपकडून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी ?

पंकजा मुंडे यांच्या संभाव्य राजकीय भूकंपाला घाबरून भाजपकडून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी ?

लक्षवेधी :-

येत्या बारा डिसेंबर रोजी पंकजाताई राजकीय भुंकप करणार या बातमीने काल संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित केलेल्या पंकजाताईंनी भाजपाची धाकधूक वाढवली आहे. शिवसेने सोबत त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत त्यामुळे त्या शिवसेनेत जातात की राजू शेट्टी यांच्यासारखा स्वतःचा पक्ष काढतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना भाजपाने देखील पक्षाची संभाव्य पडझड होऊ नये म्हणून पंकजाताई यांच्या या भुंकपाला रोखण्यासाठी त्यांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत. पंकजाताई यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यासाठी विचार चालू आहे. पंकजाताई व एकनाथ खडसे या दोन नावापैकी एकाची या पदावर लवकरच वर्णी लागणार आहे. परंतु पंकजाताई यांना पक्षाने डावलले तर मग पंकजाताईंनी केलेली बारा तारखेची घोषणा भाजपाला चांगलीच महागात पडू शकते अशी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा