You are here
Home > महाराष्ट्र > शासकीय नोकर भरतीसाठीची महापोर्टल सेवा बंद करा.

शासकीय नोकर भरतीसाठीची महापोर्टल सेवा बंद करा.

खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी ! 

महाराष्ट्र खबर :-

मागील देवेंद्र फडणवीस सरकारने महापोर्टल सुरु करून सरकारी नौकरीसाठी अक्षरशः बेरोजगाराना वेठीस धरलेले आहे. मात्र या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने
करण्यात येत आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया यांच्याशी अनेक युवां नियमित संवाद साधत असतात.
त्यांच्या अनेक अडचणी ते त्यांच्यासमोर मांडत असतात. आणि राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास
करणाच्या युवांची संख्या बघता प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या अनेक
विद्याध्थ्यांच्या मार्गात महापोर्टल ही सेवा मदत ठरण्याऐवजी अडचण निर्माण करते आहे.असे
आपल्या निवेदनातून स्पष्ट करून
राज्यभरातील युवांची मागणी आहे की महापोर्टल सेवा बंद करुन पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेतली
जावी. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा