You are here
Home > चंद्रपूर > स्थानिक पोलिस गुन्हे शाखेची मोठी करवाई, फरार आरोपीला बनावट दारू साठयासह केली अटक

स्थानिक पोलिस गुन्हे शाखेची मोठी करवाई, फरार आरोपीला बनावट दारू साठयासह केली अटक

फरार आरोपी पायल बादल खंजर यांच्या घरातून बनावट दारू पकडून केली अटक .

चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरात दारू मोठ्या प्रमाणांत विकल्या जात असली तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांची गोची झाली आहे. शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरात बनावट दारू विक्रीच्या प्रकरणात पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार झालेली आरोपी पायल बादल खंजर ही महिला बिनधास्तपणे पुन्हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला लागतात फरार आरोपी पायल बादल
कजर रा. बुदाई दफाई फल ,महाकाली कॉलरी वार्ड,चंद्रपुर हीचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 ई. सह क. 465 भादवि अन्वये
गुन्हा नोंद करण्यांत आला आहे, सुरेश गोमाजी केमेकर पोहवा ब.नं. 1533 वय 56 वर्ष, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद करण्यांत आला असून सदर माहिती त्यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी बातमी कि पायल बादल खंजर रा. बुदाई दफाई फैल ,महाकाली कलरी वार्ड,चंद्रपुर हीचे
राहते घरामध्ये बनावट विदेशी दारुचा साठा आहे, सदर बातमीच्या अनुषंगाने राकेश बाबाराव पवार वय 27 वर्ष रा. तुकुम चद्रपुर
व राजकुमार गोपाल नंदवशी वय 40 व्श रा. बालाजी वार्ड, चंद्रपुर यांना पंच म्हणून बोलावुन सत्यता पडताळणीसाठी सुचनापत्र देवुन सोबत
येण्यास केळविले. पच येण्यास तयार झाल्याने पोलीस नियंत्रण कक्ष स्टेडा नोंद क्र.28/19 वेळ 20.05 वाजता नुसार पोलिसांनी सोबत वरील पच
व पोस्टाफ पोउपनि विकास मुंढे, सफौ पंडित वाटे/778, पोशी अनुप डांग/680, पोषि नितीन/2549,मपोशी भारती/ 82 व चालक पौशी यांनी सदर महिलेच्या घरी धाड टाकून तिच्याकडून मोठ्या प्रमाणांत दारूचा साठा पकडला.आणि तिला अटक केली.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा