You are here
Home > चंद्रपूर > नागभीड येथे डॉ.प्रियंका रेड्डी सारखी घटना,

नागभीड येथे डॉ.प्रियंका रेड्डी सारखी घटना,

सोनू पठाण या महिलेचा सडक्या अवस्थेत म्रूतदेह आढळला.बलात्कार करून ठार मारल्याची शंका ! 

नागभीड प्रतिनिधी :-

सद्ध्या देशात महिलावरील अत्त्याच्याराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली असून डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अत्त्याच्याराची शाई वाळते न वाळते तोच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोसेखुर्द कॉलनीच्या मागे मुरूमच्या खदाणीजवळ एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय जवळ असलेल्या गोसेखुर्द कॉलोनी मागील परिसरातील मुरूम खदाणी जवळ सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधी आल्याने संशयास्पद स्थिती लक्षात येताच लगेच पोलीस नागभीड पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली.या तरुणीच्या चेहऱ्याकडील भाग पूर्णता खराब झालेला असल्याने सुरुवातीला ओळख पटविणे कठीण झाले. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि त्या महिलेची ओळख सोनू असलम खान पठाण वय 28 वर्षे म्हणून पटली.

सोनूचे वडील असलम खान पठाण यांनी 27 नोव्हेम्बर पासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 30 नोव्हेंबरला पोलिस स्टेशन मधे दिली होती.पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली पण शोध लागला नाही.मात्र नागभीड शहरातील काही नागरिकांनी एक म्रुतदेह सडक्या अवस्थेत असल्याची माहिती दिल्यानंतर मृतक ही सोनू अस्लम पठाण (28) असल्याची वडीलाकडून खात्री पटुण वडिलांनी तो मृतदेह सोनूचा असल्याची कबुली दिली.

मृतक सोनू अस्लम पठाण ही नागभीड येथील फकीर मोहल्यात राहत होती तिच्यामागे 1 मुलगी 1 मुलगा आहे.तिचा मृत्यू कश्यामुळे झाला ? कि तिच्यावर अत्त्याच्यार करून तिला ठार केले?  या मागचे गूढ अजून कायम असून पोलीस तपासात काय निष्पन्न होणार याकडे नागभीड शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे. या घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा