You are here
Home > वरोरा > भद्रावती येथें डी.आई.जी मल्लिकार्जुन यांनी घेतला जनता दरबार !

भद्रावती येथें डी.आई.जी मल्लिकार्जुन यांनी घेतला जनता दरबार !

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-

नागपूर विभागाचे पोलिस डी.आई.जी.प्रसन्ना मल्लिकार्जुन यानी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये भेट देवुन जनता दरबार कार्यक्रमात जनतेचा समस्या ऐकून घेतल्या.त्यांनी  पोलीस स्टेशन भद्रावती येथें जनता व पोलीस यांचामध्ये समन्वय कसा ठेवायचा ? व लोकांच्या मानसिक बदलामुळे गुन्हेगारीला आटोक्यात कसे आणू शकतो ? याबाबत आपले प्रबोधन केले. या प्रसंगी मंचावर पोलीस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी , अप्पर पोलिस आधिशक प्रशांत खैरे , एस डी .पी .ओ पांडे. ठाणेदार सुनील सिंग पवार .होते .या वेळी नगर अध्यक्ष अनिल धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित होते.
आपले विचार मांडताना अनिल धानोरकर यांनी भद्रावती शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून जेंव्हा अतिक्रमण काढायचे होते तेव्हा पोलीस विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे बोलून दाखविले.

चोरट्या मार्गाने दारू तस्करी मोठया प्रमाणांत होत आहेत व यांमधे शाळेतील मुले पण दारू विक्रीच्या व्यवसायात असून ते दारूच्या अधीन होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे शहरात पोलिस विभागाने सी .सी .टी .वी . कैमेरे लावावे व जे आहेत ते बंद असल्याने चोरी चे प्रमाण वाढले आहे ते कमी करून गुन्हेगारीवर वचक बसवावा अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात आली.

या प्रसंगी जनतेने डी .आई .जी .समोर आपल्या समस्या मांडल्या या वेळी नगर सेवेक , नगर सेविका , प्रतिष्ठित नागरिक ,व्यापारी वर्ग , गनमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी मल्लिकार्जुन यांनी आपल्या सर्व तक्रारीची दखल एस .पी .मोहेष्वर रेड्डी घेतील अशा सूचना देवून तत्काळ सूचनाची अंमलबजावनी करण्याचे आदेश दिले.त्या नंतर पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा