You are here
Home > कोरपणा > बोकडडोह माईन्स भागात वन्यप्राण्याचा वावर. सिमेंट कंपनीने केले दिवे बंद.कुसूबी गावात वन्यप्राण्यांची दहशत.

बोकडडोह माईन्स भागात वन्यप्राण्याचा वावर. सिमेंट कंपनीने केले दिवे बंद.कुसूबी गावात वन्यप्राण्यांची दहशत.

 

गडचांदुर प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधि :

मानीकगड डोगंर पायथ्याशी असलेल्या बोकडडोह कुसुंबी भागात स्फोटकाचा आवाज व सतत चुनखडी उत्खननसाठी होणारी व्रुक्षाची कत्तल यामुळे वन्यप्राण्यांचे निवारे नस्ट होत असल्याने व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पाळीव प्राण्यांनी लक्ष केले असतांनाच ध्वनी प्रदूषण व वाहणाची वर्दळ आणि कंपनीच्या हापर चा सतत होणारा सुसाट गोंगाट, आवाजामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वन्य प्राण्यांचे
नैसर्गीक निवारे व जैविक अन्न आणि त्यांच्यासाठी असलेली विविधता लुप्त होत असल्याने वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
यापूर्वी माणिकगड खदानी मध्ये दगडाचा माराने बिबटचा बछडा मुत्यु पावला मात्र वन अधिकारी यांनी कुठलाही वाजा गाजा न होऊ देता या प्रकरणावर पंचनाम्याचे सोंग करूण पडदा पाडला.या भागातील खदानी मध्ये वण्य प्राण्यांची सुरक्षा आणि सुविधेचा अभाव असल्याने तुष्णाभागविण्यासाठी अनेक सांभर चितळ हरण डुकरे पाण्यात बुडून किवा डोंगरावरून धावताना सरंक्षण भित किवा तोरचे कुपंन नसल्याने मरण पावले व अनेक कांकबन व बांबेझरी पाटागुडा भागातील पाळीव जनावरे व वण्यप्राणीचे . तोल जाऊन खोलदरीत खदानी मध्ये मुत्य पावल्याचे घटना घडल्या.मात्र या सर्व घटना उघड पाडण्या ऐवजी कंपनीचा भोंगळ कारभार लपविण्याचा प्रकार वनविभागाकडुन सुरु आहे या परिसरातील खदानी जवळ असलेल्या कुसुंबी गावाच्या पश्चिम दिशेला हायमाक्स लाईट टावर ४ महिन्यापासुन मानीकगड सिमेंट कंपनीने बंद केल्यामुळे गावालगत रात्रौचा काळोख अधांरात वाघाच्या डरकाळीमुळे गावात भितीचे वातावरण पसरले असुन आस्वलीच्या वावरामुळे शेतातील कामे व जगंलातील उपज वनमजुरावर उपासमारीची पाळी आल्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त व बंद केलेले माईन्समधिल टावर हायमाक्स सुरू करण्याची मागणी कुसुंबी वासीयांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बासमवार यांना निवेदन देऊन अरूण उद्दे बापुराव आत्राम भाऊराव कनाके यांनी केली आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा