You are here
Home > मुंबई > काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, केदार, व यशोमती ठाकुर यांच्यात मंत्रिपदाची रस्सीखेच ?

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, केदार, व यशोमती ठाकुर यांच्यात मंत्रिपदाची रस्सीखेच ?

चंद्रपूर प्रतिनिधी:-

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात विधानसभेचे हिवाळी अधिवेशना पूर्वी
आपली वर्णी लागावी यासाठी
काँग्रेसमध्ये जोरदार रस्खीखेच सुरू आहे, ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होणे हिवाळी अधिवेशनात अपेक्षित आहे.
खातेवाटपासंदर्भात चर्चा १० डिसेंबरच्या आसपास
करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत तळ ठोकून असतानाच या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या
इच्छुकांनी देखील गर्दी केल्याचे चित्र आहे,
विदर्भातील मुलूख मैदानी तोफ आणि आपल्या संघटन कौशल्याने सतत विजयी होण्याचा मान मिळविणारे दिग्गज विजय वडेट्टीवार हे लवकरच शपथ घेणार असल्याचे म्हटले म्हटल्या जात आहे.. तर
वडेट्टीवार यांचेनंतर यशोमती ठाकूर अधिवेशनानंतर डिसेंबरच्या
आणि सुनील केदार यांच्यासह शेवटच्या आठवड्यात काही आमदार मंत्री होतील अशी चर्चा आहे.
आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून अनेक काँग्रेस आमदार १० जनपथसह जेष्ठ नेत्यांच्या घराभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

विधानसभेचे नागपूर अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार !

तत्पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, असे काँग्रेसचे मत आहे. तर जुना मित्रपक्ष अधिवेशनानंतर विस्तार करण्यासाठी आग्रही आहे. यामुळे विस्तार होईलच असे ठामपणे सांगता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणेआहे. काँग्रेसच्यावाट्याला १३ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. त्यातील एक जागा मित्रपक्षासाठी सोडली जाणार आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार झाला, तर विश्वजीत कदम, बंटी पाटील आणि मुंबईतून एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यातून भौगोलिक समतोल साधणे हा काँग्रेसचा हेतू आहे,असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा