You are here
Home > मुंबई > पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार

पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार

monsoon session will be held in Mumbai

नागपूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा नाद देवेंद्र सरकारने सोडला आहे. आगामी पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून मुंबईत सुरु होईल. राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे.

गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा पायंडा पाडला होता. पण पावसाने झोडपून काढल्याने सरकारची खूप फजिती झाली होती. तो कटू अनुभव लक्षात घेऊन सरकारने पावसाळी अधिवेशन मुंबईतच करायचे ठरवले आहे. युती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असेल. कारण त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. नव्या सरकारचे पहिले अधिवेशन हिवाळी असेल आणि ते नागपुरातच होईल.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा