You are here
Home > राष्ट्रीय > डॉक्टर प्रियकराने झाडली डॉ. प्रेयसीवर मोटारीतच गोळी आणि स्वतःही ……

डॉक्टर प्रियकराने झाडली डॉ. प्रेयसीवर मोटारीतच गोळी आणि स्वतःही ……

प्रेमाचा अंत :-

मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62 वर्षीय डॉक्टरने 55 वर्षीय प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली व स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली डायरी :-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागात मोटारीच्या आत रक्ताने माखलेले दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोटारीत डॉक्टर आणि त्याच्या महिला मैत्रिणीचा मृतदेह आढळला. गोळी घालून या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मोटारीमध्ये परवानाधारक पिस्तूलही आढळून आहे आहे. डॉक्टरचे नाव ओमप्रकाश कुकरेजा (वय 62) असून, सुदीप्ता दत्ता मुखर्जी (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
रोहिणीमध्येच सुदीप्ता मुखर्जी यांचे निर्वाण नावाचे एक नर्सिंग होम असून, त्या एमडी होत्या. ओमप्रकाश कुकरेजा त्याच नर्सिंग होममध्ये डॉक्टर होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. सुदीप्ता मुखर्जी या ओमप्रकाश यांच्याकडे विवाहाची मागणी करत होत्या. ओमप्रकाश हे विवाहित असून, यांच्या पत्नी दिव्यांग आहेत. यामधून बाचाबाची होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा