You are here
Home > कोरपणा > कोलाम आदिवासीवर गुन्हे दाखल करून माणिकगड कंपनीला अवैध उत्खनन व बांधकामाला प्रशासनाची मंजुरी ?

कोलाम आदिवासीवर गुन्हे दाखल करून माणिकगड कंपनीला अवैध उत्खनन व बांधकामाला प्रशासनाची मंजुरी ?

सायलो क्रेशर वनक्षेत्रात कंपनी कडून अनधिकृत कामे , प्रशासन झोपेत ! 

प्रमोद खिरटकर  प्रतिनिधी  -:

माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन हे मागील अनेक दिवसापासुन कोलाम आदिवासी समाजावर अन्याय करून वनविभागाच्या आणि कोलाम आदिवासीच्या जमिनीवर कब्जा करून पोलिस करवाई पर्यंत मजल मारून चर्चेत आहे. कंपनीचा अनागोंदी कारभाराने नवनविन वादग्रस्त मुद्दे  उघड्यावर येत असल्याने मानीकगड कंपनीच्या मुजोरीमुळे कोलाम आदीवासीवर किती अन्याय होत असावा याची अनुभुती जनतेला कळत आहे.मात्र शासन प्रशासनाकडून याकडे होणारा कानडोळा  व कुपंनच शेत खात असल्याने शासनाला महसुल व आर्थिक फटका बसत आहे. कंपनीची मुजोरी व अधिकाऱ्याची चुप्पी ने कंपनीचा पसारा शासकीय व वनजमीनीवर डोळा ठेऊन अनाधिकृत कब्जा करण्याचा प्रकार फोफावला आहे. योग्य दिशेने चौकशीचे चक्र फिरवल्यास अनेक गोंधळ उघड पडेल यात मात्र शंकां नाही. उपरोक्त बाधंकाम प्रथम टप्प्यात कामाच्या अनियमिता या कारणावरुन तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी १९८२ ते ८५ कालावधी मध्ये अनेकवेळा पि. ओ. आर. व पंचनामे करुण कंपनीवर दडांत्मक कार्यवाही करूण वरिष्ठ कार्यालयाला अहवाल दिला. मात्र दंडाची रक्कम व कार्यवाही चा घोडा अडल्याने बाधकाम पुर्ण होऊन उद्योग सुरु झाला नाही.वन विभागाने दिलेल्या २५९ हेक्टर क्षेत्राबाहेर कुसंबी नाल्याचे पलीकडे सायलो क्रेशर [हॉपर] उभारणी करूण त्यानतंर नव्याने नाविन प्रकल्पासाठी सायलो उभारणीचे काम वेगात सध्या सुरू असुन कुसूंबी नौकारी सार्वजनिक रस्त्यावर वरच्या भागातुन व रस्यालगत हॉपर पासुन कुसंबी ते गोवारी गुडा नौकारी रस्त्यावर भुपुष्ठभौगधिकार महसुल किवा बाधं काम विभागाची मजुरी न घेता बकेट व ब्लॅड रोपवे उभारणी करूण ठिकठिकाणी रस त्यावर वरूण दगड व गिट्टी वरुण खाली पडून वाटसरुना अनेकवेळा दुखापत सहन करण्याची पाळी येते मात्र ठिकाणी नव्या प्रकल्प साठी / तिसऱ्या युनिटचे काम वेगात सुरू असतांंना मजुरंक्षेत्राबाहेर ब्राम्बे झरी शिवारात काम चालु असतांंना प्रशासन व वन विभागाच्या भुमिकेवर नागरिकात शंका निर्माण होत असुन शेतकऱ्याचे अतिक्रमण वनक्षेत्रात तत्परतेने हटविणारे व गुन्हे दाखल करणारे कंपनीच्या गोंधळाकडे कायदयाचा बडगा कधी उगारणार असा सवाल उतम पवार रामदास मगांम शंकर आत्राम यांनी केला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा