
जियो ची दे धणाधण नेट सुविधा होणार महाग !
ग्राहक वार्ता :-
अलीकडेच,व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने 42% किंमतीत वाढीसह नवीन योजना आणल्या आहेत, ज्या 3 डिसेंबरपासून लागू केल्या गेल्या. त्यामुळे आता आता मुकेश अंबानी यांनीही मोठी घोषणा करून जियो चे रिचार्ज दर 40 टक्क्यांनी वाढविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की जियो कंपनी वाढीव दर 6 डिसेंबर 2019 पासून म्हणजे उद्यापासून लागू करेल. याचा अर्थ आता इतर कंपन्या 3 डिसेंबरपासून आययूसी शुल्कदेखील सुरू करणार आहेत.पण आता जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी यांच्यासाठीआहे की जिओ आपल्या योजनेच्या किंमतींमध्ये केवळ 40% वाढ करेल.पण
40% वाढ करतांना सुद्धा त्यांचा 300% अधिक नफा होणार आहे.
आतापर्यंत जियो कंपनीने दूरसंचार विश्वात एक मोठा धमाका करून अगदी 149 रुपयात महिनाभर मोबाईल ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत रिचार्ज उपलब्ध करून दिले त्यामुळेच संपूर्ण भारतात जियोला सर्वात जास्त ग्राहक ला लाभले. पण आता आयडिया वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी रिचार्ज दर वाढविले असल्याने जियोने सुद्धा आपल्या दरात 40 टक्क्यांनी वाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे. अर्थात जियोची दे धनाधन नेट सुविधा महाग होणार आहे.