You are here
Home > महत्वाची बातमी > त्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का ?

त्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का ?

ब्रेकिंग न्यूज:-

पोलिस एनकाऊंटर कितपत योग्य? 

हैदराबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी यांच्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस आयुक्त वीसी सज्जनार यांच्या आदेशाने एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे ह्या चारही आरोपींना पहाटेच घटनास्थळी का नेण्यात आले? आणि जर त्यांना तिथे नेले तर एवढी पोलिस सुरक्षा का नव्हती ? की आरोपी पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार होण्याचा प्रयत्न करतील ? या व इतर अनेक प्रश्नांचा उलगडा या पोलिस एनकाऊंटर मधे ठार केलेल्या आरोपीच्या संदर्भात होताना दिसत नाही. खरं तर त्या चारही आरोपी विरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असतांनाच ते पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले जातात हे कस काय शक्य आहे ? आरोपी अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला असं म्हटल्या जात आहे. पण यावर विश्वास ठेवणार कोण ?
आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. ही माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे..पण जेंव्हा आरोपी पळाले होते तेव्हा पोलिसवाले काय करीत होते ? काय त्यांना गोळ्या न मारता सहज पकडल्या गेलं नसतं का ? महत्वाची बाब म्हणजे आरोपी हे निशस्त्र होते मग पोलिसांना अशी कुठली भिती होती की त्यांना गोळ्याच चालवाव्या लागल्या ? या प्रश्नांची उत्तरे आता एनकाऊंटर करणारे पोलिस आयुक्त वीसी सज्जनार देतील का ? कारण आरोपींना केवळ एवकाऊंटर करून हा मामला संपवायचा होता असं चित्र दिसत आहे. या घटनेमागे ज्या पद्धतीने चित्र रंगवले गेले तेच खरे चित्र होते हे कशावरून ? आणि या प्रकऱणानंतर ज्या पद्धतीचे राजकीय बयान आले आहे ते अतिशय सन्देहास्प्द आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण जे चारही आरोपी एकाच वेळी मारले गेले हे शक्य वाटत नाही तर यामागे आणखी कोणी बडी आसामी इथे गुंतली असावी व त्यांना वाचविण्यासाठी हा एनकाऊंटर केला असावा याला बळ मिळत आहे.

या प्रकऱणामधे आरोपी विरोधात सबळ पुरावे मिळायच्या आतच पोलिसांनी ज्या पद्धतीने आरोपीचे एनकाऊंटर केले. ते संविधानिक कायद्याला पायदळी तुडवणारे आहे. कायद्यानुसार त्या आरोपींना फाशीची शिक्षाच होणार होती आणि ती फाशी जर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा देता आली असती जेणेकरून बलात्कार करणाऱ्यांना एक प्रकारची कायद्याची भिती झाली असती,  पण अशा प्रकारे आरोपींचा एनकाऊंटर करणे कायदा हातात घेऊन जनतेचा कायद्यावरचा विश्वास नाहीसा करण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच अशा एनकाऊंटरचे समर्थन कोणीच करणार नाही …

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा