You are here
Home > कोरपणा > श्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली ! 

श्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा येथे ग्रंथालय, समाजशास्त्र विभाग व रासेयो यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली कार्यक्रमआयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डाॅ संजय लाटेलवार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सर्व समावेशक, संपुर्ण भारत सुजलाम सुफलाम होईल, संपुर्ण भारतातील लोकांचे कल्याण होईल असे होते असे मत व्यक्त केले. तसेच दुसरे मार्गदर्शक म्हणून प्रा. विश्वास शंभरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून चिकित्सक दृष्टिकोन स्विकारावे विभुतीपुजक बनू नये असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एस. एम. वारकड उपस्थित होते. तसेच मंचावरती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. राजेश खेराणी उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. राजेंद्र मुद्दमवार, डाॅ संतोष देठे, प्रा. मनिष पोतनुरवार, प्रा. युवराज जांभुळकर, प्रा. नागनाथ मनुरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षेतत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सारीका साबळे, ग्रंथपाल यांनी केले तर आभार प्रा. विठ्ठल शा. आत्राम समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी मानले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा