You are here
Home > कृषि व बाजार > उद्या माझ्या सरकारने चुका केल्यास, इतरांनी विरोध करायलाच हवा! – राज ठाकरे

उद्या माझ्या सरकारने चुका केल्यास, इतरांनी विरोध करायलाच हवा! – राज ठाकरे

ठाणे :- जे चुकीचं सुरू आहे त्याचा विरोध करायलाच हवा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी योग्य कामं केली नाहीत. केवळ घोषणाबाजी करत, स्वप्न दाखवून त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे. काँग्रेसच्या सरकारने कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो. उद्या माझं सरकार आलं आणि मी चुका केल्या, फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललं गेलंच पाहिजे. असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी ते म्हणाले की, राज्यातल्या मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारने फसवणूक केली आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे असंही राज ठाकरे म्हणाले. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला, आणि  आता त्यांनी बाहेर यावे आणि स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान करून मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं आहे.असा आरोप सुद्धा त्यांनी केला. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असं राजसाहेब  ठाकरे यांनी यावेळी म्हणाले ….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा