You are here
Home > Breaking News > अर्थ च्या वर्धापनदिन निमित रक्तदान शिबीर संपन्न!

अर्थ च्या वर्धापनदिन निमित रक्तदान शिबीर संपन्न!

अर्थ आणि जस्फ यांच्या संयुक्त पुढाकार.

जिवती/कोरपणा प्रतिनिधी प्रमोद गिरडकर  :-

दिनांक २९ डिंसेबर २०१९ रोज रविवारला अर्थ संस्थेच्या च्या वर्धापन दिनानिमित्त अर्थ आणि जस्फ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन जिवती येथे करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य मा. गोदरू पाटील जुमनाके यांनी केले तर अध्यक्ष म्हणून मा.हरिभाऊ मोरे( नगरसेवक/ माजी सभापती ) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.लक्ष्मण मंगाम ,प्रा.गंगाधर लांडगे , प्रा. पांडुरंग सावंत , प्रा.संजय मुंडे , अशपाक भाई शेख (उपनगराध्यक्ष ) , जमालु भाई शेख , लक्ष्मन बिरादर ,गोविन्द टोकरे , तुकाराम गिर्माजी , भारत बिरादार, ज्ञानोबा बिरादार , प्रभाकर पवार , संदीप चव्हाण सर( विस्तार अधिकारी) , देशमुख सर , दुर्योधन सर , वारकड़ सर , डॉ कुलभूषण मोरे (संचालक अर्थ ) हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भूषण मोरे यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हा रक्तपेढी शासकीय रुग्णालय चंद्रपूर चे रक्तपेढी पथक व डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्थ चे आरोग्यदूत तालुका प्रतिनिधी भारत बिरादार, मयूर नगराळे, सोमेश्वर भज्भुजे , शुभम आत्राम, विजय मेंढी तसेच संचालक डॉ.भूषण मोरे यांनी परिश्रम घेतले रक्तदान शिबिरात तालुक्यातील युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन रक्तदान केले एकूण 30 लोकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचा उपयोग तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी नक्कीच होणार आहे…!

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा