You are here
Home > चंद्रपूर > आर्केस्ट्राच्या नावावर वाहतूक नियंत्रण पोलिस अधिकारी यादव यांची ट्रान्स्पोर्टवाल्यांकडून कोट्यावधीची वसुली ?

आर्केस्ट्राच्या नावावर वाहतूक नियंत्रण पोलिस अधिकारी यादव यांची ट्रान्स्पोर्टवाल्यांकडून कोट्यावधीची वसुली ?

पोलिस पंचनामा :

प्रत्त्येक ट्रक हायवा गाडीमागे ५००० रुपये. हजारो गाड्यापासून कोट्यावधी रुपये होनार जमा, पोलिस अधिक्षक यांची मंजुरी आहे का ? या प्रश्नाचे उत्तर कोण देणारं? 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात पोलिस प्रशासनातर्फे दरवर्षी पोलिस कल्याणनिधी जमा करण्यासाठी विविध सांस्क्रुतिक कार्यक्रम घेतल्या जातो. या करिता त्या कार्यक्रमाच्या तिकिटा विक्रीसाठी प्रत्त्येक पोलिस स्टेशनच्या ठाणेदार यांना काही तिकिटे खपवन्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडून दिल्या जातात पण या वर्षी मात्र जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने अवैध धंदेवाईक यांच्याकडून प्रत्त्येक पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे आर्केस्ट्राच्या नावाखाली वसुली करीत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.
चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक यादव हे तर चंद्रपूर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व ट्रान्स्पोर्टच्या मालकाकडून प्रतेक गाडीमागे ५०००/- रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती सामोरं आली आहे. वाहतूक शाखा तूकूम येथे कार्यरत पोलिस निरीक्षक यादव हे या अगोदर दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे कार्यरत होते त्यावेळी त्यांनी अवैध दारू आणि सट्टा चालविणाऱ्या माफियाकडून वसुली मोठ्या प्रमाणांत चालवली असल्याने त्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गेल्याने यांची भद्रावती येथे बदली झाली होती पण तिथे सुद्धा यांनी आपल्या अवैध धंदेवाईक यांच्याकडून वसुली करण्याच्या नादात आपली प्रतिमा खराब केली आहे. मात्र तिथून बदली चंद्रपूर शहरात ट्राफिक कार्यालयात झाल्यानंतर तर यांनी ट्रान्स्पोर्ट मालकाकडून प्रत्त्येक गाडीमागे ५००० /- रुपये जोरजबरदस्तीने वसुली चलवीलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऐकून ८ ते १० हजार ट्रान्स्पोर्टवाल्याकडे गाड्या आहे त्यामुळे याचा हिशोब जर केला तर जवळपास दोन कोटीच्या घरात जात असल्याने खरोखरंच एवढी मोठी रक्कम जोरजबरदस्तीने वसुली करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी यादव यांना दिले का ? हा प्रश्न आर्केस्ट्राच्या नावावर पोलिसांची वसुली यामुळे जनता विचारू लागली आहे.आता ही अवैध वसुली जिल्हा पोलिस अधिक्षक मनावर घेतात की यादव यांना माफी देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा