You are here
Home > वरोरा > शाहबाज सय्यद हा भद्रावती ठाण्यातील वसुलीवाला कोण ?

शाहबाज सय्यद हा भद्रावती ठाण्यातील वसुलीवाला कोण ?

अवैध दारू विक्रेत्यांकडून लाखोंची हप्ता वसुली!

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तालुका हा औधौगिक द्रुष्टीने महत्वपूर्ण असा तालुका असून इथे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याची सिमा लागून असून जिथून दारूची अवैध वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यात होतं असते. यामधे भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक याच वणीतून होतं आहे. इथून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होतं आहे. मात्र एवढी मोठी कोट्यावधीची अवैध दारू विक्री पोलिसांच्या मर्जीशिवाय होत असेल तर नवलच ! पण ठाणेदार पवार यांना माहीत नसतांना सुद्धा शाहबाज सय्यद नावाचा पोलिस शिपाई हा मी डीबी स्कैड मधे आहे असे अवैध दारू विक्रेत्यांना धमकावून दरमहा लाखो रुपयाची हप्ता वसुली करीत असल्याची गंभीर बाब समोर आली असून या संदर्भात नेमका हा पोलिस शिपाई आहे तरी कोण ? याबद्दल आमचे प्रतिनिधी माहिती घेत आहे. या संदर्भात एक माहिती अशी आहे की चंद्रपूर शहरातील भिवापुर वर्डातिल एक दारूच्या तस्करीतील गुन्हेगाराला भद्रावती न्यायालयात सादर केल्यानंतर तो आरोपी ह्याच शाहबाज सय्यदच्या हातात तुरी देवून तो आरोपी फरार झाला होता आणि या घटनेनंतर याला या प्रकरणी काही काळ निलंबित केले होते हे विशेष ! मात्र याबाबतीत भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नेमकी काय भूमिका घेतात याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा