You are here
Home > महाराष्ट्र > मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि फडणवीस भेटीच गमक काय ?

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि फडणवीस भेटीच गमक काय ?

भूमिपुत्रनामा :-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या . भेटीमागे राजकारणातील मोठा भूकंप मानला जात आहे. कारण यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. असे झाल्यास महाराष्ट्र्राच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण असेल. कारण याच दोन्ही नेत्यांनी एकमेकांना लोकसभा, विधानसभा निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात तोफ डागली होती.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काल एका मुलाखतीत संकेत दिले होती की मनसे भाजपबरोबर जाऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर आज राजसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही राजकीय भेट मानली जात आहे. बाळा नांदगावकर म्हणाले होती की आम्ही सर्वांनाच मदत केली आहे, आता भविष्यात कोणाबरोबर जायचं नाही जायचं हे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरेच ठरवतील. परंतु पक्षाने विचार केला तर कोणताही चमत्कार घडू शकतो, कारण राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू कधीच नसतो.
त्यामुळे येत्या काळात भाजपच्या रुळावरुन घसरलेल्या गाडीला मनसेचे इंजिन लावण्याची शक्यता आधिक आहे. आजची राजसाहेब ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची भेट याच कारणाने महत्वाची आहे. मनसेने आपल्या झेंड्यात देखील बदल केला आहे. त्या भगव्या रंगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे आता मनसेची भूमिका मराठी माणसाकडून हिंदुत्ववादाकडे वळू शकतेअशा प्रकारच्या चर्चा आता रंगायला लागल्या आहे.

महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिकेचे महापौर निवडणूकीत स्थानिक आघाड्या स्थापन झाल्या, परंतु सर्व घडामोडी नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपला मदत केली तर केडीएमसीच्या स्थायी समितीत सभापती निवडणूकीवेळी भाजप उमेदवाराला मनसेची साथ मिळाली.

यावरुन भाजप मनसेच जवळीक वाढत चालल्याची चर्चा सुरु झाली. मात्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे 23 जानेवारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबईत 23 जानेवारीला मनसेचे पहिलेच महाअधिवेशन होणार आहे आणि त्यामधे मनसेची पुढील भूमिका स्पष्ट होईल. परंतु आजची देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेब ठाकरें यांच्या भेटीमागील गमक काय ? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा