You are here
Home > कोरपणा > शिवसेनेचे शेख सरवर प्रभाग क्रमांक ६ मधे प्रचारात पुढे !

शिवसेनेचे शेख सरवर प्रभाग क्रमांक ६ मधे प्रचारात पुढे !

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले असून युती आघाडी आणि भाजप अशा तिरंगी लढतीत प्रभाग क्रमांक ६ मधे सर्वात रंगतदार लढत होत आहे. यामधे माजी नगरसेवक यांच्यासह नवीन चेहरे पण रिंगणात आहे. सर्वात कमी वयाचे मनसेचे रुषिकेश भारती यांच्यासह शिवसेनेचे शेख सरवर, भाजपचे मालपाणी, काँग्रेसचे चेतन शेंडे यांच्यात लढत असली तरी शेख सरवर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याची चर्चा आहे. अत्यंत आक्रमक पण तितकेच दयाळू उमेदवार शेख सरवर हे प्रभागातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन योग्य ते सहकार्य करतात त्यामुळेच अल्पसंख्याक असले तरी त्यांना या प्रभागात मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे जनचर्चेतून दिसत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा