You are here
Home > कोरपणा > नीलेश ताजने यांच्या उमेदवारीने भाजपचा बंट्याधार ?

नीलेश ताजने यांच्या उमेदवारीने भाजपचा बंट्याधार ?

गडचांदूर निवडणूक विशेष :-

 

गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला असे काही चेहरे भेटले की त्यांचा पूर्व इतिहास बघता त्यांना मतदार कशासाठी मतदान करतील ? असा प्रश्न पडला आहे. एकीकडे स्वच्छ छबी असल्याचा आव आणणाऱ्या भाजपने कुठल्याही स्थितीत निवडणूक जिंकायची या इर्शेने अनेकांची आर्थिक लुबाडणूक करणारे नीलेश ताजने यांना भाजपने उमेदवारी देवून भाजप सुद्धा आता स्वच्छ प्रतिमा असलेली राजकीय संघटना नाही तर ती अशाच भ्रष्ट आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची पक्ष संघटना आहे हे या निवडणुकीच्या माध्यमांतून दाखवून दिले आहे.
नीलेश ताजने हे अगोदर शिवसेनेत असतांना त्यांनी स्वप्नपूर्ती चिटफंड हे शिवसेनेचे सचिन भोयर यांच्यासोबत सुरू केले होते.पण त्यामधे त्यांनी स्वतःच ते चिटफंड स्वतःच्या नावे करून सचिन भोयर यांच्यासोबत दगा फटका केला होता. मात्र आता ते स्वप्नपूर्ती चिटफंड गायब झाले असून गुंतवणूकदारांचे पैसे अजूनही दिले गेले नसल्याची माहिती आहे.शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे अरुण निमजे यांच्या छत्रछायेत असतांना एक लफड्यात सापडले असता अरुण निमजे यांनी फार मोठी मदत करून तिथून त्यांना सुखरूप बाहेर काढले होते.त्यानंतर त्यांनी दूध डेअरी प्रकल्प सुरू करून अनेक शेतकऱ्यांकडून दूध संकलन केले पण शेतकऱ्यांचे पैसेच दिले नाही. असे यांचे व्यवहार गडचांदूरकराना माहीतच आहे.
भाजपने अशा चारित्र्याचे उमेदवार देवून स्वतःचा बंट्टय़ाधार करून घेतला असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा