You are here
Home > कोरपणा > प्रभाग क्रमांक 7 मधे धनदांडग्या उमेदवारांविरोधात ज्योती कंठाळें मारणार बाजी ?

प्रभाग क्रमांक 7 मधे धनदांडग्या उमेदवारांविरोधात ज्योती कंठाळें मारणार बाजी ?

गडचांदूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव तथा मागील विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावणारे महालिंग कंठाळें यांच्या पत्नी सौ.ज्योती कंठाळें ह्या गडचांदूर प्रभाग क्रमांक 7 (ब) मधून उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजप, सेना आणि काँग्रेसच्या तिनही उमेदवार ह्या मुस्लिम असल्याने जातीय समीकरणात त्या हमखास निवडून येतील असा कयास लावल्या जात आहे, परंतु पैशाचा महापूर वाहिला जाण्याची शक्यता असल्याने इथे प्रत्त्येक मतामागे 1000 -2000 अशी बोली लागली असल्याची चर्चा आहे. परंतु गोरगरीब जनतेचा कैवार घेवून प्रशासनाशी दोन हात करणारे आणि सर्वासोबत आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक वागणारे महालिंग कंठाळें यांचा या प्रभागात चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे या प्रभागातील मतदार विकल्या जाणार नाही असेही बोलल्या जात आहे. अर्थातच या प्रभागातील धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक दिसत असली तरी राजकीय समीकरण ज्योती कंठाळें यांच्या करिता पोषक असून त्या प्रभाग क्रमांक 7 मधे त्या बाजी मारणार असल्याची राजकीय चर्चा आहे ?

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा