You are here
Home > चंद्रपूर > सावित्रीबाई चे विचार प्रेरणा देणारे, किरण बोढे यांचे प्रतिपादन.

सावित्रीबाई चे विचार प्रेरणा देणारे, किरण बोढे यांचे प्रतिपादन.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह !

घूग्गूस प्रतिनिधी :-

3 जानेवारीला सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी किरण बोढे यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले  व सावित्रीबाईच्या  जिवनावर प्रकाश टाकला, सावित्रीबाईचा जन्म 3 जाने 1831 रोजी सातारा जिल्हातील नायगांव या खेड्यात झाला, सावित्रीबाई ह्या भारतीय शिक्षीका, कवयित्री, समाज सुधारक होत्या,  त्यामुळे त्यांनी आशीया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरु करीत स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली व मुलींना शिक्षण देण्याची सुरवात केली,  महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाच्या आरंभीक टप्प्यात त्यांचे पती ज्योतीराव फुले यांचा सह त्यांनी मोठी कामगीरी बजावली, त्यांनी स्त्री व शुद्रां मध्ये शिक्षणाचा प्रसार केला, त्या भारतातील पहिल्या मुख्यध्यापिका ठरल्या,  त्यांनी विधवांचे होणारे  केशवपन थांबविण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवुन आनला व “सत्यशोधक समाज” ही संघटना उभी केली, त्यांना त्यांचा कार्याबद्दल “क्रांतीज्योती” पुरस्कार मिळाला होता, अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांचेशी झाला होता असे प्रतिपादन किरण बोढे अध्यक्ष प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी यांनी केले,यावेळी सुषमा सावे, सुचिता लुटे ग्रापं सदस्या, अर्चना भोंगळे,निशा उरकुडे, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर नाशीमा कुरेशी, उषा बोंडे, करिश्मा दांडवे, सोनु बाहादे, प्रिती धोटे, शितल कामतवार व खुशबु मेश्राम उपस्थित होत्या

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा