You are here
Home > चंद्रपूर > जिल्हास्तरीय स्वयंरोजगार ब उद्दोजकता मार्गदर्शन शिबिर वरोरा येथे १ व २ फेब्रुवारीला !

जिल्हास्तरीय स्वयंरोजगार ब उद्दोजकता मार्गदर्शन शिबिर वरोरा येथे १ व २ फेब्रुवारीला !

शिबिरामधे ५००० बेरोजगार युवक, युवती व महिला सहभागी होण्याची शक्यता !

वरोरा प्रतिनिधी :-

देशाचे आणि राज्याचे सरकारी नौकरी संदर्भात धोरण हे आता खाजगीकरणाचे असून कंत्राटी पद्धतीने ज्या नौकऱ्या अनेक शासकीय कार्यालयात आहे त्यामधे आरक्षण नाही आणि त्या कंत्राटी कंपनीमधे स्थानिक बेरोजगार युवकांना स्थान मिळेल याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे चांगले शिक्षण असून सुद्धा नौकरीच मिळत नसलेला बेरोजगार युवक आता हवालदिल झाला आहे, आणि तो नौकरीच्या शोधात वणवण भटकत आहे. अशा स्थितीत तरून बेरोजगारांची फौज दरवर्षी वाढत असून चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर एका वर्षी आईटीआय, इंजिनियर, डॉक्टर्स, डी एड, बी एड. आणि पदवीधर असे ऐकून ३० ते ५० हजार बेरोजगार नौकरीच्या शोधात निघत असतात, पण महत्वाची बाब अशी आहे की ज्या प्रमाणात दरवर्षी जवळपास ५० हजार बेरोजगार तयार होतात परंतु जुन्याच लोकांना रोजगार किंव्हा नौकऱ्या सरकारने दिल्या नाही तर बाकी नवीन बेरोजगाराना काय संधी देणार? आणि म्हणूनच आता तरून बेरोजगाराना स्वयंरोजगार किंव्हा स्वतःचा ऊद्धोग करण्याशिवाय पर्याय नाही.
या संदर्भात सामजिक नवक्रांतीचे प्रणेते आणि समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले सामजिक नेते व रूरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे उपाध्यक्ष रमेश राजूरकर यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून स्वयंरोजगार व ऊद्दोजकता विकास शिबिराचे आयोजन क्रिडा संकुल रेल्वे स्टेशन रोड वरोरा येथे दिनांक १ ते २ फेब्रुवारी २०२० ला करण्यात आले आहे. या शिबिरात देशपातळीवरील ऊद्दोजक व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन होणार असून व्यवसायाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध करण्याच्या द्रुष्टीने उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. एकूणच बेरोजगार युवक, युवती व महिलांना या शिबिर कार्यक्रमातून स्वतःचा स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा मिळावी या व्यापक द्रुष्टीकोनातून या स्वयंरोजगार व ऊद्दोजकता शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी या शिबिराला जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक युवती व बचत गटातून व्यवसाय निर्माण करणाऱ्या इच्छुक महिलांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आव्हान या शिबिराचे मुख्य आयोजक रमेश राजूरकर यांनी एका प्रशीद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

One thought on “जिल्हास्तरीय स्वयंरोजगार ब उद्दोजकता मार्गदर्शन शिबिर वरोरा येथे १ व २ फेब्रुवारीला !

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा