You are here
Home > वरोरा > अवैध दारू विक्रेत्यांकडून शाहबाज सय्यद करतोय लाखोंची हप्ता वसुली! 

अवैध दारू विक्रेत्यांकडून शाहबाज सय्यद करतोय लाखोंची हप्ता वसुली! 

बातमी प्रकाशित झाल्यानंतर सुद्धा ठाणेदार गप्प कां ? 

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती पोलिस स्टेशन हे नेहमीच वादात अडकलेले असते, कारण इथे अवैध दारू विक्रेते, कोळसा व वाळु तस्कर इत्यादींचा बोलबाला असल्याने पोलिस स्टेशन मधे जोपर्यंत सेट्टिंग होत नाही तोपर्यन्त अवैध धंदे चालणार नाही म्हणून अवैध धंदेवाले आणि पोलिस यांची अभद्र युती होऊन गुण्यागोविंदाने यांचे आर्थिक व्यवहार चालत असतात. मग एक पोलिस कर्मचारी हा ठाणेदार आणि अवैध धंदेवाले यांच्यातील विश्वस्त असतो ज्यांचेकडे आर्थिक व्यवहार असतो आणि भद्रावती पोलिस स्टेशन मधे शाहबाज सय्यद ही भूमिका पार पाडत असल्याची बाब आता उघड झाली आहे. यामधे सर्वात जास्त उलाढाल होते ती अवैध दारू वाहतूक आणि विक्री त्यामुळे औधौगिक द्रुष्टीने महत्वपूर्ण अशा भद्रावती तालुक्याच्या सिमा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सिमेला लागून असून जिथून दारूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात होतं असते आणि इथून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होतं आहे. मात्र कोट्यावधीची अवैध दारू विक्री एक हप्ता वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर होत आहे. या संदर्भात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर सदर प्रकरणाची बातमी झळकली पण ठाणेदार पवार यांना सर्व माहीत असतांना सुद्धा शाहबाज सय्यद नावाचा पोलिस शिपाई यांच्यावर त्यांनी काहीएक करवाई केली नाही. उलट मी डीबी स्कैड मधे आहे असे अवैध दारू विक्रेत्यांना धमकावून दरमहा लाखो रुपयाची हप्ता वसुली करीत असलेल्या शाहबाज सय्यद याला पाठीशी घालून जणू मी पण या अवैध हप्ता वसुली मधे सारखाच दोषी असल्याच्या भावना ठाणेदार अप्रत्यक्षपणे जाहीर करीत तर नाही ना?  अशा चर्चा  रंगत आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलिस प्रशासन या गंभीर बाबी संदर्भात काय निर्णय घेणार , याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

2 thoughts on “अवैध दारू विक्रेत्यांकडून शाहबाज सय्यद करतोय लाखोंची हप्ता वसुली! 

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा