You are here
Home > वरोरा > युवक-युवतीसाठी स्वयंरोजगार संधी या विषयावर रमेश राजूरकर यांचे व्याख्यान !

युवक-युवतीसाठी स्वयंरोजगार संधी या विषयावर रमेश राजूरकर यांचे व्याख्यान !

धनोजे कुणबी समाजाचा भव्य राज्यस्तरीय उपवर वर-वधू परिचय व सामूहिक सोहळा भद्रावती येथे सुरू ! 

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती शहरातील राजमनी गार्डन गौराळा रोड येथे भव्य राज्यस्तरीय उपवर वर-वधू परिचय व सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आस्थादायी समाज मंडळ, धनोजे कुणबी भद्रावतीद्वारे दिनांक ११ व १२ जानेवारीला करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धनोजे कुणबी समाजातील युवा-युवतीना येणाऱ्या काळात नौकरीच्या संधी फारशा नसल्याने स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने या संदर्भात स्वयंरोजगाराच्या कुठे, कशा संधी आहे ? याबाबत सामाजिक नवक्रांती निर्माण करणारे समाजसुधारक व यशस्वी ऊद्दोजक रमेशजी राजूरकर यांचे व्याख्यान त्या मेळाव्यात दिनांक १२ फेब्रुवारीला दुपारी २,०० वाजता होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी समाजातील सर्व यूवा-युवतीनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा