You are here
Home > चंद्रपूर > पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत पकडला लाखोंचा दारूसाठा !

पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत पकडला लाखोंचा दारूसाठा !

मोठया प्रमाणातील देशी दारुचे साम्यासह ०९,७१,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्य शासनाने चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी केलेली असताना सुध्दा अवैध दारु वाहतुकीत गुंतलेले
गुन्हेगार चोरटया मार्गाने बाहेरील जिल्ह्यातून दारुसाठा चद्रपुर शहरात करीत असतांना वाहतूक करणाऱ्या या दारु तस्करावर पडोली पोलीसांकडून नेहमीच नजर तेवून असतात व वेळोवेळी प्रभावी कार्यवाही करतात.याच
कार्यवाहीच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात देशी विदेशी दारुसाठा चंद्रपुर शहरात घेवुन जात असलेल्या गुन्हेगारांचा
प्रयत्न हाणुन पाडण्यात पडोली पोलीसांना आजपर्यंत मोठया प्रमाणात यश मिळाले आहे.

आज दि.१३.०१.२०२० रोजी सकाळी गोपनिय माहितीद्वारे मिळालेल्या माहिती प्रमाणे पो.स्टे.
पडोली हद्दीतील मौजा देवाडा-वेंडली मार्गावरील टि पॉईन्ट जवळ करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान
मारुती सुझुकी स्विफ्ट VDL कार क्र. एमएच ३४/के/९१९६ ला मोठया शिताफीने अडवून झडती
घेतली असता सदर कार मध्ये ९० मिली देशी दारुने भरलेल्या सिलबंद रॉकेट संवा कंपनीचे देशी
दारुच्या ३३ पेटया आणि टँगो पंच कंपनीचे देशी दारुच्या ३३ पेटया अशा एकण ४५ पेटया असा
एकुण किं. ४.५०,०००/-रू.चा देशी दारुचा साठा, दारु वाहतुकीकरीता वापरलेली स्विफ्ट कार आणि
आरोपींचे मोबाईल फोन असा एकण ९,७१,०००/- रु.चा महमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर
देशी दारुसाठा वाहतुक करणारे आरोपी (2) आकाश उर्फ किटू मल्हारी भगत वय २२ वर्षे आणि (२)
अक्षय व्यंकटस्वामी तलाडे वय २४ वर्षे दोन्ही रा.शालीकराम नगर घुगुस कॉलरी चंद्रपुर यांना
ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणात पो.स्टे.पडोली येथे दारुबंदी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात
आलेला असून तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस
अधिक्षक आणि . शिलवंत नादेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली
पडोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बि.एम.गायगोले, पोलीस कर्मचारी संदिप वासेकर, स्वप्नील
बुरीले, लक्ष्मण रामटेके, भुषण टोंग यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा