You are here
Home > कोरपणा > युवक दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर !

युवक दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधि:-

ईमिनन्स इन्टरनॅशनल स्कुल कोरपना येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय युवक दिना निमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, वडगाव, चंद्रपूरच्या वतीने प्रबोधन व साहित्य प्रसार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवाश्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे संचालक विजयराव बावणे, माजी जि.प. सदस्य कोडापे, डॉ. रोहिणी झोडे, डॉ. खनके, युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य उपस्थित असून त्यांचे सहकार्य दिसून आले.
यावेळी युवक तसेच महिलांनी रक्तदान केले. परिसरातील गरजू नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. मेडिकल कॉलेज चंद्रपूर तसेच आशा संस्थेचे डॉक्टर व चमू यांनी सेवा दिली.महाशिबिरात एकुण 390रुग्णाच्या तपासण्या झाल्या त्यापैकी 17 रुग्ण अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये असल्याने पुढील उपचारासाठी नागपुर येथे पाठविण्याची जेवाबदारी युवा प्रतिष्टान याची राईल.
शिवभावे जीव सेवा हा मंत्र स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिला असून कोणतेही सेवा कार्य करीत असताना ही भावना जपायला हवी असा विचार डॉ. झोडे यांनी मांडला. सेवाश्रमाचे लक्ष्मणराव सूर यांनी गीत सादर केले, व विशेष सहकार्य दिनेश राठोड ,श्रीकांत लोडे ,अमोल लोडे , संचालन शंकर तडस यांनी केले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा