You are here
Home > चंद्रपूर > घुग्घुस येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न !

घुग्घुस येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न !

 

प्रमोद गिरटकर :-

भव्य शोभायात्रा दिनांक १०.०१.२०२० ला, दुपारी ३.०० वाजता बोंबले पेट्रोल पंप पासून काढण्यात आली,त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक यांचा हस्ते शोभायात्राची सुरुवात करण्यात आली, या शोभायात्रेला हजारोंच्या संख्येने सर्व तेली बांधव सहपरिवार सहित उपस्थित होते, लहान मुलं, मुली, पुरुष, महिला, जेष्ठ नागरिक सुद्धा सहभागी झालेले होते, शोभायात्रा मध्ये शिस्त आणि शांत एका मागे एक लाईन राहून शोभायात्रेची शोभा वाढवली,बोंबले पेट्रोल पंप पासून,पोलीस स्टेशन, आठवडी बाजार, विद्या टॉकीज, समशान भूमी,अमराई रोड बहादे प्लॉट, श्रीराम वार्ड, गांधी चौक, झाडे कॉम्प्लेक्स येथे शोभायात्रा संपन्न झाली, त्यानंतर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम घेण्यात सुद्धा आला,कार्यक्रमाचे आयोजक :- विदर्भ तेली समाज महासंघ शाखा घुग्घुस,ता.जि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाने शोभायात्रा व कार्यक्रम घेण्यात आला..!

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा