You are here
Home > कोरपणा > गडचांदूर नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीत पदासाठी रस्सीखेच !

गडचांदूर नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीत पदासाठी रस्सीखेच !

सत्तेसाठी बहुमत असतांनाही पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कलंगितुरा ?

गडचांदुर प्रतिनिधी :-

नुकतीच गडचांदूर नगरपरिषद निवडणूक पार पडली आणि आता क्राॅग्रेस पक्षाचे 5 तर राष्ट्रवादी चे 4 अशी आघाडीची सत्ता आली,  मात्र  गटनेता रजिस्टर्ड करण्यासाठी काल चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आघाडीचे नगरसेवक पोहचल्याची माहिती मिळाली असून गटनेता कोणत्या पक्षाचा यावरून काँग्रेस राष्ट्रवादीमधे  रस्सीखेच सुरु आहे , सत्ताधारी नगरसेवकामध्येमधेच जर सत्तेच्या सुरवातीत रस्सीखेच सुरू आहे तर पुढे गडचांदुरकरानी काँग्रेस  राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारावर विश्वास ठेवायचा कसा ? हा प्रश्नच आहे. जो विश्वास ठेऊन त्यांना विजयी केले मात्र आता तर चक्क गटनेता पदासाठी रस्सी खेच सुरु आहेत. मग पुढे उपाध्यक्ष पदासाठी कोण दावा करेल हे कळायला मार्ग नसून आणि जर अशीच रस्सीखेच काँगेस राष्ट्रवादीची सुरू असेल तर शिवसेना भाजप आणि शेतकरी संघटना या पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येवून काँग्रेस किंव्हा राष्ट्रवादीचा एक नगरसेवक फोडला तर सगळी सत्ता डामडौल होऊ शकते अशीच राजकीय परिस्थिती दिसत आहे आणि अशाच राजकीय समिकरणाकडे गडचांदुर शहरातील मतदारांचे लक्ष लागले आहे…शिवसेना 5 भाजप 2 संघटना 1 यांना एक नगरसेवक कमी पडत असल्याने ते सत्तेच्या दुर आहे, आणि योगा योगाने  काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षातील एक नगरसेवक फुटुन या विकास आघाडी समावेश झाला तर बहुमत मिळून उपाध्यक्ष पदापासून काँग्रेस राष्ट्रवादीला दुर राहण्याची वेळ येणार तर नाही ना अशी सुध्दा चर्चा सुरू आहे…

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा