You are here
Home > चंद्रपूर > शिद्दार्थ हायस्कूल चंद्रपूरच्या भिंती रंगवताय वसतिगृहातील विद्यार्थी !

शिद्दार्थ हायस्कूल चंद्रपूरच्या भिंती रंगवताय वसतिगृहातील विद्यार्थी !

थंडीत कुडकुडत विद्यार्थी कलर्स मारताना म्हणे हा मुख्याध्यापकांचा आदेश !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

समाजातील गोर गरीब विद्यार्थ्याना मोफत व शक्तीच शिक्षण सरकार देतं असं म्हटल्या जातं पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. चंद्रपूर शहरातील घुटकाला वार्डात असलेली शिद्दार्थ हायस्कूल ही फार जुनी शैक्षणिक संस्था असून इथे गोर गरीब आणि ज्यांना आई वडील नाही अशांना इथे वसतिगृहाची व्यवस्था केली आहे. जवळपास ५६ ते ५७ विद्यार्थी संख्या असलेल्या या वसतिगृहात समाजकल्याण विभागाकडून मान्यता असल्याचे व त्यासाठी निधी सुद्धा मिळत असल्याचे बोलल्या जातं आहे. परंतु या परिसराची स्वच्छता आणि इतर कामे या गरीब विद्यार्थ्यांकडून शाळेचे मुख्याध्यापक व इतर कर्मचारी करून घेत असल्याचा गंभीर प्रकार समाजकल्याण विभागाला नसावा असेच ऐकून चित्र दिसत आहे. कारण शाळेत कार्यक्रम आहे या सबबीखाली या विद्यार्थ्याना शाळेची संपूर्ण इमारत आणि शाळेच्या भिंती रंगवन्यासाठी ह्या मुलांना शाळा सुटल्यानंतर कामाला लावल्या जाते आणि एवढ्या मोठ्या शाळेच्या इमारतीसह भिंती रंगवन्याचे काम सुद्धा आता पूर्णत्वास या विद्यार्थ्यांनी नेले असल्याने शाळा व्यवस्थापनाचा लाखों रुपयाचा खर्च वाचविण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून ज्या पद्धतीने हे काम करवून घेतले आहे व ते सुद्धा थंडीत रात्री ९,०० वाजेपर्यंत, त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर असून या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाविरोधात चौकशी करून करवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा