You are here
Home > महत्वाची बातमी > अनुसुचित जाती व जमातींच्या रिक्त  जागांसाठी ऑफलाइन प्रवेश सुरु

अनुसुचित जाती व जमातींच्या रिक्त  जागांसाठी ऑफलाइन प्रवेश सुरु

भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसी) मधील अभ्यासक्रम 

26 ऑगस्ट रोजी लेखी परिक्षेचे आयोजन

नागपूर/अमरावती 21 ऑगस्ट  2019

नवी दिल्ली येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिन असणा-या भारतीय जनसंचार संस्था( इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन -आयआयएमसी) येथील  पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविकेच्या अनुसुचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या रिक्त  जागा भरण्यासाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रीया  घेण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या 32जागासांठी   आयआयएमसीच्या अमरावती, धेनकनाल. कोट्टायम, जम्मू, ऐजवाल येथील   6  प्रादेशिक  केंद्रात ऑफलाइन प्रवेश उपलब्ध आहेत.

आयआयएमसी दिल्लीत हिंदी व उर्दू पत्रकारिता पदविकेसाठी 7 जागा, आयआयएमसी धेनकनाल येथे इंग्रजी व ओडिया पत्रकारिता पदविकेसाठी 10 जागा, आयआयएमसी अमरावती येथे इंग्रजी व मराठी पत्रकारिता पदविकेसाठी  4 जागा,आयआयएमसी कोट्टायममध्ये इंग्रजी व मल्याळम पत्रकारिता पदविकेसाठी 6  तर  आयआयएमसी ऐजवाल  साठी 2 आणि आयआयएमसी जम्मूच्या इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या 3 जागा उपलब्ध आहेत.

प्रवर्गनिहाय तपशीलाची माहिती http://www.iimc.gov.in   या संकेस्थळावर उपलब्ध आहे. सामान्य प्रवर्ग,  इतर मागासवर्गीय आणि  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गांसाठी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण  झालेली आहे.

कोणत्याही  विषयात मान्यताप्राप्त  विद्यापीठाचे  पदवीधर असलेले भारतीय नागरिक सदर अभ्यासक्रमास अर्ज करण्यास पात्र आहेत.  अभ्यासक्रमा संदर्भातील माहिती,शुल्क व ऑनलाइन अर्जाच्या प्रक्रियेचा तपशील संस्थेच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लेखी परिक्षा व मुलाखत 26 ऑगस्ट 2019 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता  घेण्यात येणार असून उमेदवार आपली नावे  संबंधित  केंद्रात नोंदवू शकतात, अशी माहिती  भारतीय जनसंचार संस्था नवी दिल्ली मार्फत दिली गेली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा