You are here
Home > नागपूर > नागपूर शहर व ग्रामीण उपनिबंधक कार्यालये सरकारी इमारतीत स्थानांतरित करा ! 

नागपूर शहर व ग्रामीण उपनिबंधक कार्यालये सरकारी इमारतीत स्थानांतरित करा ! 

मनसे महिला सेनेची,  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
——————————————प्रतिनिधी नागपूर :-

नागपूर शहरात एकूण १० उप निबंधक कार्यालये असून त्यापैकी ८ कार्यालये खाजगी ईमारतीत तर फक्त २ कार्यालये सरकारी ईमारतीत आहेत. ८ खाजगी ईमारतीत असणा-या उप निबंधक कार्यालयाचा भाड्यापोटी प्रती माह होणारा खर्च हा रू. २,१८,१२५/- असून हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे ह्यासाठी दि. १३.०१.२०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा सौ. कल्पना चौव्हान यांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी श्री. रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन सदर खर्च टाळण्यासाठी शासकिय ईमारतीत अथवा महापालिकेच्या बंद शाळांमध्ये हि कार्यालये स्थानांतरीत करण्याची विनंती करण्यात आली जेणेकरुन भाड्यापोटी मिळणारे पैसे हे शासनाला अथवा महापालिकेला मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यात मदत होईल.

सदर ८ उपनिबंधक कार्यालये ज्या खाजगी इमारतीत आहेत त्या इमारती राजकीय पक्षांशी निगडीत पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांच्या असून भाड्यापोटी मिळणारे प्रचंड उत्पन्न त्यांच्या घशात घातले जात आहे हे मा. जिल्हाधिकाऱ्यांना चर्चे दरम्यान पुराव्यानिशी दाखविण्यात आले. सदर निवेदनाचे मा. जिल्हाधिकारी यांनी कौतूक करुन सदर निवेदनाचा निश्चित विचार केला जाईल असा सकारात्मक निर्णय दिला.

निवेदनाला जनहित विभागाचे राज्य सरचिटणीस श्री. महेश जोशी, मनसे शहर अध्यक्ष श्री. विशाल बडगे, जनहित विभागाचे राज्य चिटणीस श्री. सुश्रुत खेर, जिल्हाध्यक्ष श्री. इकबाल रिझवी, शहर अध्यक्ष श्री. अरुण तिवारी, जनहित विभागाचे शहर सचिव श्री. पराग सावजी तसेच महिला सेनेच्या सौ. वैशाली बनकर, सौ. अल्का राचलवार, चेतना चौधरी, कनीजा बेगम, लता होलघरे, अर्चना खंडाळे उपस्थित होत्या. त्याच बरोबर जनहित कक्षाचे उपाध्यक्ष श्री. विकास साखरे व श्री. नितीन खानोरकार, विभाग अध्यक्ष श्री. पंकज हटवार व श्री. पंकज तपासे, तालुका अध्यक्ष श्री. सूरज सोनवणे, विभाग उपाध्यक्ष श्री. परिमल मोरे, श्री. अबारार अहमद, श्री. एजाज शेख तसेच मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा