You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांची फसलेली दारूबंदी उठणार ?

चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांची फसलेली दारूबंदी उठणार ?

जिल्ह्यात अवैध दारूविक्रीचा उच्चांक, चोर, बदमाश, गुंड मालामाल तर तरून बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ! 

लक्षवेधी :-

कुठलेही ठोस असे कारण नसतांना व दारूमुळे कुठलीही अशी मोठी दुर्घटना झाली नसतांना केवळ आपला होरा दाखवण्यासाठी आणि कुणाला तरी आर्थिक झळ पोहचवूण आपला वचपा काढण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात केलेली दारूबंदी ही राज्याचा महसूल बुडवण्यापलीकडे काही साध्य न करणारी घटना म्हणावी लागेल. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 60% ऊद्धोग पाच वर्षात बंद होऊन हजारो कामगार, कर्मचारी बेरोजगार झाले, तर दुसरीकडे दारू सुरू असतांना चणे, फुटाने विकणारे हातठेले, स्वयंपाकी, बारमधे काम करणारे वेटर, तिथे साफसफाई आणि स्वयंपाक करणाऱ्या महिला हे सर्व दारूबंदीनंतर बेरोजगार झाले, त्यामुळे राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर रोजगाराच्या संधी तर नवयुवकाना मिळाल्या नाहीच उलट जिल्ह्यातील ऊद्धोग बंद झाल्याने आणि दारूबंदी झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले. असं म्हटल्या जातं की जर तुम्हाला कुणासाठी काही चांगलं करता येत नसेल तर कुणाचं कधी वाईट करू नका, पण सुधीर मुनगंटीवार यांचा दारूबंदीचा निर्णय हा चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो लोकांसाठी अभिशाप ठरला, म्हणजे लोकांचे वाईट करणारा ठरला आणि ह्या दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था ढासळली हे कुणीही नाकारू शकत नाही.
खरं तर एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा रोजगार घालवून सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र स्वतःची प्रगती अर्थमंत्री असताना खूप केली, दाताळा एमआयडीसी परिसरात कोट्यावधीचे फॉर्म हाऊस. गिरनार चौक परिसरात अनेक राज्यातून खास मटेरियल आणि कारागीर बोलवून कोट्यावधीचा बांधलेला बंगला ही उपलब्धी त्यांनी मिळवली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तरून बेरोजगार यांना वाऱ्यावर सोडून चोर, बदमाश, लुटेरे यांना जणू अवैध दारू विक्रीचे परवाने देवून जिल्ह्यात अवैध व्यवसायाचा बाजार भरवला, आता मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवणे आवश्यक आहे नाहीतर तरून बेरोजगार युवक जे नौकरिच्या शोधात आहे ते चोऱ्या करतील, कुणाचे खून करतील आणि व्यसनाधीन होतील, अर्थात युवा पिढी बरबाद होईल आणि म्हणूनच जवळपास 60% जिल्ह्यातील ऊद्धोग बंद झाल्याने वाढलेली बेरोजगारी दारूबंदी उठवल्याने थोडी कमी होईल कारण अधिकृत दारू व्यवसायात जे हजारो लोक बियर बार. वाईन शॉप.आणि देशी दारू दुकानात काम करीत होते आणि त्या दुकानांसमोर जे हातठेलेवाले चणे फुटाने आणि इतर चखणा विकत होते. कुणी वेटर तर कुणी स्वयंपाकी होते त्यांना रोजगार मिळेल आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पैशाची रेलचेल होईल अर्थात चंद्रपूर जिल्ह्यातील बाजारात तेजी येईल.
महाराष्ट्रा आता सरकार बदलल्याने दारूबंदी उठवण्याच्या हालचाली सुरू आहेत हे स्वागतार्ह बाब आहेच पण या चांगल्या कामात सुधीर मुनगंटीवार यांनी उगाच अडथळा निर्माण करून आपल्या फसलेल्या दारूबंदीवर पांघरूण घालू नये एवढीच चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे.कारण आम्ही व्यसनमुक्ती करिता ४ कोटी रुपये देवू असे म्हणणारे सुधीर मुनगंटीवार हे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले नाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला अवैध मार्गाने येणारी विषारी आणि बनावट दारू प्यायला लावून आजारी केले, त्यामुळे स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी या दारूबंदी उठवण्याच्या कार्यात हातभार लावावा अशी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा