You are here
Home > गडचिरोली > पोलीस स्टेशन व्येंकटापुर येथे आदिवासी नुत्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने!

पोलीस स्टेशन व्येंकटापुर येथे आदिवासी नुत्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने!

शासकीय आश्रमशाळा व्येंकटापुर प्रथम पुरस्काराचे मानकरी!

तालुका प्रतिनिधी :=

अहेरी तालुक्यातील व्येंकटापुर येथे गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व उप पोलीस स्टेशन व्येंकटापुर यांचे वतीने नुकतेच आदिवासी रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी संस्कृती, परंपरा यांची जपणूक व कलागुणांना प्रोत्साहन देवून जनता व प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी तसेच आदिवासी समाज बांधवांचा सर्वागीण विकास होण्याच्या हेतुने एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रास्ताविकातून विशद करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आवलमारी येथिल सरपंच सौ सुनंदाबाई कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून आवलमारी चे पोलीस पाटील मनोहर पागडे, व्येंकटापुर चे पोलीस पाटील बाबुराव झाडे, कनैली चे पोलीस पाटील गंगाराम आत्राम, चिन्नावट्रा चे पोलीस पाटील बुधाजी आत्राम, लंकाचेन चे पोलीस पाटील श्यामराव कुळमेथे, लोकमत चे प्रतिनिधी मुन्ना कांबळे, उप पोलीस स्टेशन व्येंकटापुर चे प्रभारी अधिकारी मिलींद कुंभार, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेत पोलीस स्टेशन व्येंकटापुर अंतर्गत येणाऱ्या आंबेझरा, लंकाचेन, कनैली, चिन्नावट्रा, पेदावटा, कोतागुडम, व्येंकटापुर वआवलमारी इत्यादी गावातील दहा संघानी स्पर्धेकरिता सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील विजय संघ निवडणेकरीता सरपंच व सर्व गावचे पोलीस पाटील यांची निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रू.3000/शासकीय आश्रम शाळा व्येंकटापुर तर द्वितीय क्रमांक रूप. 2000/नितेश तलांडे व त्यांची टिम आवलमारी व जयश्री सिडाम आवलमारी तसेच तृतीय क्रमांक रू.1000 अश्विनी तलांडे व त्यांची टीम यांनी मिळविला. त्या तिन्ही विजयी संघास पोलीस दलातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई सुनिल घुगे यांनी केले तर प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुंभार यांनी केले. उपस्थितांचे आभार संतोष दहेलकर यांनी मानले. स्पर्धा बघायला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा