You are here
Home > चंद्रपूर > शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या कार्यालयात चालतो सट्टा : पोलिसांची धाड -गुन्हा दाखल

शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या कार्यालयात चालतो सट्टा : पोलिसांची धाड -गुन्हा दाखल

संदीप गिऱ्हे यांच्या आशीर्वादामुळे उरकुडे ची वाढली मजल. यापूर्वी ही दुर्गा उत्सव तंबूत पोलिसांनी टाकली होती बबन उरकुडे च्या सट्टा व्यवसायावर धाड, 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राजुरा विधानसभेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून वावरणारे(पदावर आहेत की नाहीत स्पष्टोक्ती नाही )बबन उरकुडे यांच्या राजुरा आठवडी बाजार येथील कार्यालयात रात्री सट्टा चालत असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस चमूने सोमवारी रात्री धाड टाकली असता बबन उरकुडे सहित काही लोक पत्ते खेळत असताना रकमेसहित रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर राजुरा पोलीस ठाणे येथे बबन उरकुडे च्या अवैध सट्टा व्यावसायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त असल्याने बबन उरकुडेची पक्षात नेहमी पाठराखण होत असून गिऱ्हे यांच्या दबावाने नेहमी त्याचा अवैध वसुली, सट्टा व इतरही बाबीतून सुटका होत असल्याने उरकुडे ची मजल वाढत असल्याची चर्चा आहे.बबन उरकुडे यांची शिवसेना कारकीर्द सतत वादग्रस्त असून मागील 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी तालुका प्रमुख पदावरून हटविल्यामुळे त्यांनी लगेच पक्षाला शिव्या ठोकत माजी आमदार वामनराव चटप यांची साथ धरत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. त्यातही विशेष म्हणजे शेतकरी संघटनेत गेल्यावर प्रत्येक मंचावरून शिवसेनेला अश्लील शब्दात शिवीगाळ करणारे उरकुडे अचानक संदीप गिऱ्हे यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ पडल्याने, त्यांच्या अभूतपूर्व आशीर्वादाने शिवसेनेत परत आले.

स्थानिक कार्यकर्ते व तालुका प्रमुख व्हिग्नोज राजूरकर यांचा विरोध झुगारत जिल्हाप्रमुखांनी बबन उरकुडे ला उपजिल्हा प्रमुख पद देऊन राजुरा येथे “शेतकरी मदत केंद्र” च्या नावावर उभारलेल्या कार्यालयाचे उदघाट्न सुद्धा केले. याच शेतकरी मदत केंद्रावर सट्टा चालविला जात असल्याची शहरात चर्चा असून,2 दिवस आधी धाड मारण्यात आली होती.यापूर्वीसुद्धा बबन उरकुडे आयोजित करीत असलेल्या दुर्गा उत्सव मंडळावर रात्री सट्टा चालत असताना धाड पडली होती परंतु जिल्हाप्रमुख सतत बबन उरकुडे यांना पाठराखण करून अवैध धंद्याला चालना देत असल्याची खमंग चर्चा आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुखाचा बबन उरकुडे वर वरदहस्त का?

शिवसेनेतून शेतकरी संघटनेत गेल्यावर पक्षाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या बबन उरकुडे ला संदीप गिऱ्हे यांनी पुन्हा प्रवेश घरून थेट उपजिल्हा प्रमुख पद बहाल केल्यानंर, शिवीगाळीचा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला असता शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख श्री अरविंद नेरकर यांनी संदीप गिऱ्हे यांना खुलेआम कार्यकर्त्यांसमोर बबन उरकुडे ची हाकलपट्टी पक्षातून केली असून याची अंमलबजावणी करण्याची तंबी देऊन सुद्धा गिऱ्हे त्यांना सतत का पाठीशी घालतात, यामागे उरकुडे यांच्याकडील  कोणती  भूमिका काम करीत आहे ? याबाबत  उरकुडे यांचेच कार्यकर्ते दबल्या आवाजात चर्चा करतांना आढळतात अशी माहिती आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा