
पत्रकार सरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाईची मागणी होणार !
राजुरा प्रतिनिधी :-
राजकारण हा बदमाशाचा शेवटचा अड्डा आहे असं म्हटल्या जातं, पण ही सत्य परिस्थिती असल्याची बाब आता उघड होऊ लागली आहे. कारण अशाच पद्धतीच्या लोकांनी राजकारणात शिरून राजकीय क्षेत्राला बदनाम केले आहे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे तथाकथित उपजिल्हा प्रमुख म्हणून वावरणारे बबन उरकुडे यांना नुकतीच त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात रात्री जूव्वा खेळताना रंगेहाथ पोलिसांनी पकडून त्यांचेवर गुन्हा दाखल केला आणि अटक सुद्धा केली होती. या संदर्भात अनेक व्रुतपत्रात बातम्या पण प्रकाशित झाल्या होत्या, अशाच आशयाची बातमी मात्र पूर्ण सत्य बातमी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलला लावण्यात आली. ही गोष्ट बबन उरकुडे यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी सायंकाळी संपादक राजू कुकडे यांना फोन केला आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेवून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, मात्र बबन उरकुडे यांनी जी खालची पातळी ओलांडली ती अतिशय पक्ष विघातक आणि शिवसेना पक्षाला कधीच न पटणारी बाब आहे. त्यामुळे आता शिवसेना पदाधिकारी याबाबत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.