You are here
Home > वरोरा > शाहबाज सय्यद ह्या पोलिस शिपायाची अजूनही हप्ता वसुली सुरूच?

शाहबाज सय्यद ह्या पोलिस शिपायाची अजूनही हप्ता वसुली सुरूच?

भद्रावती पोलिस स्टेशन मधे ठाणेदाराकडूनच शाहबाज सय्यद यांचे सरक्षण? अनेक जेष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनी सुद्धा याबाबत दिली कबुली ! 

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती पोलिस स्टेशन हे नेहमीच वादग्रस्त आणि अवैध धंदेवाल्यांना सरक्षण देणारं ठरलं आहे. इथे वाळु तस्कर,  कोयला तस्कर तर मोठ्या प्रमाणात आहेच पण अवैध दारू वाहतूक व विक्रीच हे मोठं ठिकाण आहे. एक वेळ जिल्ह्यात कुठेही दारू मिळणार नाही पण भद्रावती येथे मात्र हमखास अवैध दारू मिळणारच आणि असं जर असेल तर पोलिसांच्या मर्जीशिवाय कुणी अवैध दारू विकेल हे शक्यच नाही हे सर्वश्रुत आहे. या पोलिस स्टेशन मधे ठाणेदार साखरकर ते ठाणेदार यादव व आता ठाणेदार पवार यांच्यापर्यंतचा वारसा हा असाच सुरू आहे,  याबाबत सप्ताहिक भूमिपूत्राची हाक या व्रुत्तपत्रात नेहमीच बातम्या प्रकाशित होत होत्या, अशीच बातमी प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन ठाणेदार साखरकर यांनी संपादकावर मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्याची धमकी दिली होती, मात्र चक्र उलटे फिरले आणि तीन दिवसांतच त्यांना लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने वाळूच्या प्रकरणात एका ट्राफिक पोलिस शिपायाला पैसे घेताना रंगेहाथ पकडून त्यात ठाणेदार साखरकर यांचा सहभाग असल्याने त्यांना सुद्धा अटक करून गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर काही अंशी अवैध धंदेवाल्यावर अंकुश बसला होता, मात्र आता परिस्थिती उलट होत असून ज्या शाहबाज सय्यद ह्या अवघ्या सन 2014 मधे पोलिस विभागात नियुक्त झालेला  पोलिस शिपायी अवैध दारू व्यावसायिकांकडून हप्ता वसुली करीत असल्याची गंभीर बाब प्रकाशित झाल्यानंतर सुद्धा ठाणेदार पवार हे शाहबाज सय्यद यांना संरक्षण व प्रोत्साहन कां देतं आहे ? हे कळायला मार्ग नसून आता ठाणेदार साखरकर सारखीच पुन्हा पुनरावृत्ती होणार असे चित्र दिसायला लागले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा