You are here
Home > चंद्रपूर > ट्राफिक पोलिसांनी पैशाची सापडलेली पर्स केली परत !

ट्राफिक पोलिसांनी पैशाची सापडलेली पर्स केली परत !

पोलिस विभागातील या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र होत आहे कौतुक !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पोलिसांच्या ‘ ‘ सदरक्षणाय खलनिग्रहनाय‘ ‘ या ब्रीद वाक्याला हड़ताळ फासणारे पोलिस आहे. ते खोट्याची साथ, गुन्हेगारांना संरक्षण आणि पीडितांना न्याय देत नसल्याची ओरड सर्वत्र होत असते, एकूणक मेलेल्या माणसांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात म्हणजे पोलिस असाही समज पसरला असतांना ट्राफिक पोलिस मेजर सोनुने, वैभव वानखेडे आणि मेजर शेंडे यांनी एका महिलेची पैशाची पर्स रस्त्यावर पडलेली सापडली असता त्या महिलेला परत करून पोलिस आपल्या कर्त्यव्याला जागतात असा आदर्श निर्माण त्यांनी निर्माण केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शहरातील जेटपुरा गेट येथे आपली ड्युटी करतांना एका महिलेची पर्स सोनुने मेजर, वैभव वानखेडे आणि मेजर शेंडे यांना रस्त्यावर पडलेली दिसली त्यामुळे ती पर्स खोलुन बघितली असता त्यामधे काही पैसे, सोन्याचे दागिने आणि आधार कार्ड, एटीएम कार्ड मिळाले.आधार कार्डवरून सदर महिलेचे नाव शालिनी चौके राहणार शिंदेवाही असे कळले, त्यावरून त्यांनी सदर महिलेला संपर्क केला आणि जेटपुरा गेट जवळ बोलवून ती पर्स त्या महिलेच्या स्वाधीन केली. खरं तर ही घटना फार सामान्य आहे मात्र पोलिसांच्या बाबतीत जनतेत जो कायम गैरसमज आहे त्यावर फुंकर घालणारी आणि पोलिसांचा आदर्श जनतेसमोर आणणारी ही घटना म्हणून खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्या तिन्ही ट्राफिक पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र भरभरून कौतुक केल्या जातं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा