You are here
Home > नागपूर > राजेश शिवरकर यांचा इंग्रजी विषयाचा १०० टक्के निकाल दिल्याबद्दल सत्कार !

राजेश शिवरकर यांचा इंग्रजी विषयाचा १०० टक्के निकाल दिल्याबद्दल सत्कार !

लोक जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी चंपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार !

बेला प्रतिनिधी :

नागपूर जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या लोक जीवन शिक्षण मंडळ ही संस्था दरवर्षी लोक जीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील माध्यमिक शालांत परीक्षेत उत्क्रुष्ट निकाल देणारी संस्था असून त्या संस्थेचे अध्यक्ष चंपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिक्षक व्रुन्द आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रामाणिक भूमिका वाजवित असतात. अशातच राजेश शिवरकर यांचे इंग्रजी विषयात नावीन्यपूर्ण योगदान नेहमीच या संस्थेच्या यशात महत्वपूर्ण असते आणि त्यांनी सतत ६ वर्षांपासून या शाळेच्या माध्यमिक शालांत  -२०१९ परीक्षेसह  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ईंग्रजी विषयाचा १००% निकाल दिल्याबद्दल त्यांना लोक जीवन शिक्षण मंडळ बेला ,चे अध्यक्ष शिक्षण महर्षी गुरुवर्य मा.चंपतरावजी देशमुख सर यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांच्या या सत्कार कार्यक्रमांमुळे इतर शिक्षकांना सुद्धा शाळेतील विद्यार्थ्याना चांगले व नावीन्यपूर्ण शिकवण्याची ऊर्जा मिळाली असे बोलल्या जातं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा