You are here
Home > चंद्रपूर > सुधीरभाऊ, आतातरी दारूबंदी उठविण्याच्या कार्यात आडकाठी आणू नका !

सुधीरभाऊ, आतातरी दारूबंदी उठविण्याच्या कार्यात आडकाठी आणू नका !

सुधीरभाऊ तुम्ही राष्ट्रवादी व कांग्रेस पक्षाची बार आणि दारूची दुकाने आहेत म्हणून बंद केलीत काय?

लक्षवेधी :-

jसुधीरभाऊ तुमचेवर या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे, तुम्ही प्रामाणिक  राजकारणी म्हणून तुमचेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या त्यामुळे फार अपेक्षा पण तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा पूर्ण अपेक्षाभंग केला आहे.तुम्ही काही दिवसांपूर्वी बोलले की शरद पवारांनी महाराष्ट्रा मध्ये तंबाखू बंदी केली त्यावेळी त्यांनी महसूल बुडेल की रोजगार हे त्यांनी बघितले नाही. पण भाऊ एक लक्षात घ्या की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात तंबाखू बंदी केली होती. मग तुम्ही पूर्ण राज्यात दारूबंदी कां करू शकला नाही ? आणि जर तुम्ही ती हिंमत केली असती तर साहजिकच तो राज्याचा धोरणात्मक निर्णय असता पण तशी हिंमत केली नाही हे सर्वश्रुत आहे, खरं तर तुम्ही दारूबंदीचा जो निर्णय घेतला होता तो राजकारणातील एक स्टंट होता हे आता सर्व चंद्रपूरकराना कळालं आहे, कारण एका माणसासोबत व दोन पक्षासोबत असलेला राजकीय वैमनस्य यातून घेतलेला तो निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या मानगुटीवर बसला आहे. ज्यामुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, जिल्ह्यात आर्थिक मंदी आली आणि चोर, लूचक्के, गुंड आणि बदमाश यांच्याकडे जणू अवैध दारू विक्रीचे परवाने दिल्या गेले आणि सोबतच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रीमंत केल्या गेले यापेक्षा दुसरी उपलब्धी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी नंतर दिसली नाही हे विशेष,
केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारू दुकाने आहेत त्यामुळेच तुम्ही दारूबंदी केली हे तुमच्या बोलण्यातून अनेकदा लक्ष्यात आले, पण याची झळ मात्र पूर्ण जिल्ह्यातील लोक भोगत आहेत. मात्र आता ठाकरे सरकारने घेतलेला दारूबंदी उठविण्याचा निर्णय अगदी योग्य आहे.व या निर्णयाचे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून स्वागत होत आहे…
“दारूबंदी हटलीच पाहिजे…बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे…आमचा जिल्हा भकास होण्यापासून वाचलाचं पाहिजे..” अशा गर्जना आता होऊ लागल्या आहे.

खरं तर तुम्ही केलेली दारूबंदी ही फसवी असली तरी ठाकरे सरकारने चंद्रपुर जिल्हा दारूबंदी उठविणार असं जाहीर केल्यानंतर तुमच्या पोटात पोटसूळ उठलंय. मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील दारुबंदीने किती आणि कोणाचा फायदा झाला ? आणि खरोखरचं दारूबंदी झाली काय?
याचा फेरआढावा घेतला तर नक्कीच जनता दारूबंदी उठविण्याच्या बाजूने आहे असे दिसेल, जिल्ह्यात दारूबंदी हटाव शिवाय जर दारूबंदी समिती निर्माण करून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून ग्रामसभेचा निर्णय मागवला .आणि ग्रामसभेमधे हा विषय ठेवला तर दारूबंदी योग्य की फसवी? याचा निकाल येईल आणि भाऊ किमान ८५% लोक तुम्हाला दारूबंदी ही फसवी आहे म्हणूनच ठराव देतील. अर्थात स्वार्थासाठी घेतलेल्या निर्णयात जर तुम्हाला विकास वाटत असेल तर तो निर्णय जिल्हा भकास करण्याचा होता हे आता आपल्याला मान्य करावेच लागेल. गावखेड्यात शिकत असणारी मुलं आपले शौक पूर्ण करण्यासाठी पैसे कमविण्याचा हवाश्यापोटी दारू विकण्याचा गोरखधंदा करून आपले आयुष्य बरबाद करीत आहेत. जिल्ह्यालगत असणाऱ्या जिल्ह्यातून रात्री – बेरात्री दारू सप्लाय करतेवेळी गाडीवर नियंत्रण नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेत. गुंडगिरी ,चोरी आणि खुनाचे प्रमाणही जिल्ह्यात भरपूर प्रमाणात वाढलेत याचाही पोलीस प्रशासना कडून आढावा घेतला तर कळेलच,
आपण पाच वर्षात एकही उद्योग जिल्ह्यात आणला नाही उलट दारूबंदी करून बेरोजगारांची फौज निर्माण केलीत.जिल्ह्यात भरपूर कोटींची अवैध दारू पकडून ती जमिनीत नष्ट केली गेली. त्या जागेवर गवत सुध्दा उगवलं नाही.आणि हेच अल्कोहोल जमिनीतून कुणाच्या विहिरीला किंवा बोअरवेल ला लागून पाण्याच्या स्त्रोत मार्फत कित्येक लोकही दारुमिश्रीत पाणीही पित असतील हेही सत्य नाकारता येत नाही, आणि कदचित आपण विसरला असाल की दारूबंदीची घोषणा झाल्यानंतर तुम्ही म्हणाला होता की चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्ती करिता ४ कोटी रुपये देणारं पण एक छदाम सुद्धा आपण दिला नाही उलट बाहेरील जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थाना व्यसनमुक्तीच्या नावावर लाखों रुपये देवून केवळ कागदाचे घोडे आपण नाचवले आणि आता फसवी दारूबंदी उठायची घोषणा ठाकरे सरकारने केल्यानंतर आपण विरोध करताय हे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पटले नाही.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा