You are here
Home > कोरपणा > जिल्हा परिषद कन्हाळगाव माध्यमिक शाळेत शालेय क्रीडा, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न

जिल्हा परिषद कन्हाळगाव माध्यमिक शाळेत शालेय क्रीडा, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न

 

विध्यार्थी हा शालेय जीवनातच खेळाडू घडू शकतो, नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका यांचे प्रतिपादन ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हाळगाव येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका तथा उपसरपंच कन्हाळगाव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वतंत्र कुमार शुक्ला मुख्याध्यापक कन्हाळगाव प्रमुख पाहुणे श्री किशोर जी मालिका,श्री रमेश चौधरी सर,श्री डोहे सर,श्री जीवतोडे सर,श्री शैलेश तेलंग,श्री गजभिये सर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर उपसरपंच कन्हाळगाव यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले व खेळाडूंचा परिचय श्री शुक्ला सर मुख्याध्यापक यांनी करून दिला श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांला शालेय जीवनातच खेळाडू घडण्याची संधी मिळत असते म्हणून विद्यार्थ्यांनी याच जीवनात चांगला खेळाडू होण्यासाठी प्रयत्न करावा व या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा या माध्यमातून आपल्या शाळेच नाव लौकिक करावं असे बोलून दाखविले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन तेलंग सार यांनी केले तर आभार गजभिये सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मनवर,कुमारी लता मडावी, विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला गावातील नागरिक, विद्यार्थी,विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा