You are here
Home > कोरपणा > मानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका! 

मानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी -:-

कोरपना तालुक्यातील आदित्य बिर्लाग्रुपचे गडचांदुर स्थीत पहीला सिमेंट ऊद्दोग उदयास आला, यासाठी गडचांदुर येथुन १२ कि मी अतंरावरील दुर्गम आदिवासी डोंगर पायथ्यात वसलेल्या कुसंबी गावाचे हरित वनवैभव नष्ट करीत येथिल आदिवासी कोलाम कुटुबांच्या शेत जमीनी  बळकाऊन  त्यांना बेघर करण्यात आले, एवढेच नव्हे तर सार्वजनिक रस्ता बंद करूण रस्त्यवर अतिक्रमण,  पिण्याचे पाणी स्त्रोत अडविणे अश्या अनेक वादात कंपनी सतत चर्चेत आहे, त्यामुळेच आदीवासीचा संयम सुटल्याने त्यांनी आंदोलन केले,  या परिसरातील देऊ कुडमेथे याच्या मालकीची ८ एकर शेतजमीन कंपनीने बळजबरी व मुजोरीने कब्जात घेवून यांत्रीक यत्रांद्वारे शेत पिकांची नासधुस व त्यातून  चुनखडी उत्खनन करुण बाधीत केले या संदर्भात पोलीस व महसुल प्रशासनाकडे तक्रार निवेदन करूण सुध्दा कंपनीवर कार्यवाही किवा गुन्हा दाखल केला नसल्यने देऊ हा आमरण उपोषण बसल्याने त्याची प्रकृती खालावली कुसूंबी येथुन उपचारासाठी नेताना कुसुबी नोकारी रस्त्यावर मानीकगढ कंपनीने गेट बसविल्याने गेट उघडण्यास सुरक्षा रक्षकांनी २ तास अडविल्याने उपचारास विलंब झाला यामुळे कुटूंबाला कंपनीच्या मनमानी विरोधात चिड निर्माण झाल्याने अखेर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र प्रकृती साथ देत नसल्याने मुत्युशी झुंज देत आहे यामुळे देऊचा मुलगा महादेव कुडमेथे हा वैतागुण कंपनीने जमीन लुटली रस्ता बळकावला नोकरी,  व जमीन मोबदला दिला नाही आणि त्यांचेवर  भिक मागायची पाळी आली यामुळे कंपनी व्यवस्थापन वर चिडुन दारुच्या नशेत बेभान होऊन महादेव कुडमेथे व गणेश सिडाम यानी कन्वर्ट बेल्ट व रोपवे ला आग लाऊन राग शमविला मात्र व्यवस्थापक यांनी जाळपोळ करुण .५० लक्षाचे मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार दाखल केल्या वरून ठानेदार भारती य़ानी पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी याच्या मार्गदर्शनात चौकशी करूण आरोपी हुळकुन काढण्यात यश आले भा द वी ४३५, ४२७ ३४ कलमान्वये अप क्र१६ /२० दाखल करूण आरोपीना जेरबंद केले आरोपीना न्यायलयात दाखल केले असता तिन्ही आरोपीची जामीनावर सुटका केली गरीब आदीवासी कुटूबावर सतत गुन्हे दाखल करुण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सिमेंट कंपनी कडून होत असल्याने नागरिकाच्या भावना तिव्र होत असुन पंचकोशीतीलं गावकरी मनमानी कारभाराचा निषेध करीत आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा